T20 World Cup, IND vs ZIM : KL Rahulला सूर गवसला, पण रोहित पुन्हा ढेपाळला; सूर्यकुमार यादव पाकिस्तानी रिझवानला पुरून उरला

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 03:09 PM2022-11-06T15:09:47+5:302022-11-06T15:10:08+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IND vs ZIM : Suryakumar Yadav becomes the first player to complete 1000 runs in T20I in 2022, SKY half century is a 4th fastest for India, India 180 for 5 | T20 World Cup, IND vs ZIM : KL Rahulला सूर गवसला, पण रोहित पुन्हा ढेपाळला; सूर्यकुमार यादव पाकिस्तानी रिझवानला पुरून उरला

T20 World Cup, IND vs ZIM : KL Rahulला सूर गवसला, पण रोहित पुन्हा ढेपाळला; सूर्यकुमार यादव पाकिस्तानी रिझवानला पुरून उरला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Zimbabwe Live : भारताने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात झिम्बाब्वेसमोर तगडे आव्हान उभे केले. कर्णधार रोहित शर्माने अपयशाचा पाढा गिरवला. लोकेश राहुलची ( KL Rahul) बॅट आज चांगलीच तळपली आणि त्याला विराट कोहलीची साथ मिळाली. पण, झिम्बाब्वेने या दोघांना ४ चेंडूंच्या अंतराने माघारी पाठवले आणि संधी मिळालेला रिषभ पंतही फेल ठरला. सूर्यकुमार यादवने बिनधास्त फटकेबाजी करताना भारताला समाधानकारक पल्ला गाठून दिला. सूर्याने पुन्हा एकदा वादळी खेळी करताना मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आणि पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवानला मागे टाकले. 

भारतीय संघाने ग्रुप २ मधील अखेरच्या सामन्यात झिम्बाब्वेविरुद्ध प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. रिषभ पंतला संधी देण्याचा निर्णय रोहितने घेतला. रोहित व लोकेश राहुल यांनी चांगली सुरूवात केली, परंतु रोहित ( १५)  पुन्हा मोठी खेळी करण्यात चुकला. लोकेशने फटकेबाजी सुरू ठेवली आणि विराट कोहली सावध खेळ करताना विकेट टिकवून होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ६० धावांची भागीदारी केली. सीन विलियम्स गोलंदाजीला आला आणि पहिल्याच षटकात त्याने विराटची ( २६) विकेट मिळवली. लोकेशने खणखणीत षटकात खेचून ३४ चेंडूंत ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील पाचवे अर्धशतक पूर्ण केले. पण, पुढच्याच चेंडूवर तो झेलबाद झाला. लोकेशने ३५ चेंडूंत ३ चौकार व ३ षटकारांसह ५१ धावा केल्या. 


 


आज संधी मिळालेला रिषभ पंत ३ धावांवर माघारी परतला. विलियम्सनच्या गोलंदाजीवर बर्लने सीमारेषेवर सुरेख झेल टिपला. फॉर्मात असलेल्या सूर्यकुमारने झिम्बाब्वेच्या गोलंदाजांना झोडले. नेहमीच्या ३६० डिग्रीच्या शैलीत सूर्याने धावांचा पाऊस पाडला. सूर्याने दमदार खेळ करताना यंदाच्या वर्षात १०००+ धावा पूर्ण केल्या. कॅलेंडर वर्षात ट्वेंटी-२०त १०००+ धावा करणारा तो पहिला भारतीय व पाकिस्तानच्या मोहम्मद रिझवाननंतर जगातला दुसरा फलंदाज ठरला. यंदाच्या वर्षात सूर्याने १००२* धावा करताना रिझवानला ( ९२४) मागे टाकले. 

२०व्या षटकात हार्दिक पांड्या ( १८) बाद झाला अन् अक्षर पटेलने एक धाव घेत सूर्याला स्ट्राईक दिली. त्यानंतर सूर्याने पायावर बसून खणखणीत षटकार खेचला. त्याने २३ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.  ट्वेंटी-२०तील त्याचे हे १२वे अर्धशतक ठरले आणि वर्ल्ड कप स्पर्धेतील भारताकडून झळकावलेले चौथे जलद अर्धशतक ठरले. भारताने ५ बाद १८६ धावा केल्या, सूर्याकुमार २५ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ६१ धावांवर नाबाद राहिला.

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: T20 World Cup, IND vs ZIM : Suryakumar Yadav becomes the first player to complete 1000 runs in T20I in 2022, SKY half century is a 4th fastest for India, India 180 for 5

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.