T20 World Cup, IND vs ZIM : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाची घोडदौड सुसाट सुरू आहे. ग्रुप १ मधून न्यूझीलंड व इंग्लंड यांनी उपांत्य फेरीतील स्थान पक्के केले आहे. पण, ग्रुप २ मधून अजून अधिकृत कोणताच संघ अंतिम चौघांत पोहोचलेला नाही. भारत व दक्षिण आफ्रिका या शर्यतीत आघाडीवर असले तरी रविवारी त्यावर शिक्कामोर्तब होईल. भारताचा ग्रुप २ मधील अंतिम सामना झिम्बाब्वेविरुद्ध होणार आहे आणि तो जिंकून टीम इंडिया टॉप स्थानासह उपांत्य फेरीत प्रेवश करण्यासाठी सज्ज आहे. पण, या लढतीपूर्वी भारतीय चाहत्यांची धडधड वाढवणारा प्रसंग घडता घडता राहिला. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे जखमी होता होता वाचले.
- ग्रुप १मध्ये न्यूझीलंड, इंग्लंड व ऑस्ट्रेलिया यांच्या प्रत्येकाच्या खात्यात ७ गुण आहेत. पण, नेट रन रेटच्या जोरावर न्यूझीलंडने ग्रुप १ मध्ये अव्वल व इंग्लंडने दुसरे स्थान पटकावत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
- आता ग्रुप २ मध्ये भारत व दक्षिण आफ्रिका या हे उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. भारत ६ गुणांसह अव्वल स्थानावर आहे आणि उद्या झिम्बाब्वेविरुद्ध विजय मिळवून ते ८ गुण व अव्वल स्थानासह उपांत्य फेरीत पोहोचतील.
- ५ गुण असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा अखेरचा सामना नेदरलँड्सविरुद्ध आहे आणि त्यात विजय मिळवला तर त्यांचे ७ गुण होतील. अशात न्यूझीलंड विरुद्ध दक्षिण आफ्रिका आणि भारत विरुद्ध इंग्लंड अशा सेमी फायनलच्या लढती होतील.
- भारत-इंग्लंड सेमी फायनल झाल्यात ती १० नोव्हेंबरला एडिलेडवर दुपारी १.३० वाजल्यापासून सुरू होईल. न्यूझीलंड- आफ्रिका उपांत्य फेरीची लढत ९ नोव्हेंबरला सिडनीवर होईल.
रोहित शर्माची बॅट या वर्ल्ड कपमध्ये गोठलेली दिसली. त्याच्याकडून धावा होताना दिसत नाही. अशात टीम इंडियाच्या सराव सत्रात राहुल व रोहित दुखापतग्रस्त झाले असते. मेलबर्न येथे भारतीय संघ सराव करत आहेत आणि त्यावेळी नेट्समध्ये उभ्या असलेल्या रोहित व राहुलच्या दिशेने वेगाने चेंडू आला. या दोघांचेही त्याकडे लक्ष नव्हते, परंतु राहुलला संकटाचा भास झाला आणि तो बाजूला झाला, रोहितनेही त्वरीत स्वतःला बाजूला केले. हा चेंडू रोहितच्या पायावर जोरात आदळला असता आणि अशात रोहितला दुखापतीमुळे उद्याच्या लढतीत बाकावर बसावे लागले असते. पण नशीब बलवत्तर होते म्हणून दोघंही थोडक्यात वाचले. SportsTak ने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"