Join us  

T20 World Cup Schedule: टीम इंडिया ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचा श्रीगणेशा पाकिस्तानविरुद्ध करणार, जाणून घ्या विराटसेनेचं संपूर्ण वेळापत्रक!

T20 World Cup Schedule: २४ ऑक्टोबरला पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यानं मिशन टी-२० वर्ल्डकपची सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2021 11:53 AM

Open in App

ICC Men's T20 World Cup 2021 Fixtures revealed : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( ICC) मंगळवारी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर केले. १७ ऑक्टोबरपासून यूएईत होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची गटवारी आयसीसीनं आधीच जाहीर केली होती, फक्त कोणता संघ कधी, कुठे व कोणाशी भिडेल याची चाहत्यांना उत्सुकता होती. विशेष म्हणजे भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या तारखेची चाहते आतुरतेनं वाट पाहत होते. अखेरीस आयसीसीनं या सर्वांवरील पडदा हटवला आणि आज संपूर्ण स्पर्धेचं वेळापत्रक जाहीर केलं.

सुरुवातीला पात्रता सामने खेळले जातील. त्यात आठ संघ असून प्रत्येक गटात ४-४ संघांचा समावेश आहे. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर १२ फेरीसाठी पात्र ठरतील. सुपर १२ फेरीत ६-६ संघांचे दोन गट तयार करण्यात आले आहेत. एक संघ पाच सामने खेळेल. सुपर १२ संघ २० मार्च २०२१ च्या आयसीसी क्रमवारीनुसार निश्चित करण्यात आले आहेत. सुपर १२ फेरीनंतर दोन्ही गटातील अव्वल प्रत्येकी दोन संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. उपांत्य फेरीतील विजेते १४ नोव्हेंबर रोजी जेतेपदासाठी खेळतील.

सुपर १२ ची विभागणी दोन गटात करण्यात आली आहे. भारताचा समावेश दुसऱ्या गटात आहे. गट साखळीत भारत ५ सामने खेळणार आहे.

विराटसेनेचं वेळापत्रक खालीलप्रमाणे-२४ ऑक्टोबर - भारत वि. पाकिस्तान, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता ३१ ऑक्टोबर- भारत वि. न्यूझीलंड, दुबई, सायंकाळी ७.३० वाजता ३ नोव्हेंबर - भारत वि. अफगाणिस्तान, अबु धाबी, वेळ सायंकाळी ७.३० वाजता५ नोव्हेंबर- भारत वि. ब गटातील अव्वल संघ, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता८ नोव्हेंबर- भारत वि. अ गटातील दुसऱ्या क्रमांकावरील संघ, दुबई, वेळ सायंकाळी ७.३० वाजता

टॅग्स :आयसीसी विश्वचषक टी-२०
Open in App