Indian team for the T20 World Cup : टीम इंडियानं आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी १५ सदस्यीय संघाची बुधवारी घोषणा केली. चार फलंदाज, दोन यष्टिरक्षक-फलंदाज, १ जलदगती अष्टपैलू, २ फिरकी अष्टपैलू, ३ फिरकीपटू व ३ जलदगती गोलंदाज असा हा संघ आहे, तर राखीव खेळाडूंमध्ये एक फलंदाज व दोन जलदगती गोलंदाजांचा समावेश आहे. शिखर धवन, पृथ्वी शॉ, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल ही अपेक्षित नावं मात्र संघातून हद्दपार झाली आहेत. पण, टीम इंडियानं आज जाहीर केलेल्या संघात बदल केला जाऊ शकतो आणि इंडियन प्रीमिअर लीग २०२१च्या दुसऱ्या टप्प्याची दखल घेतली जाऊ शकते. जाणून घ्या कशी...
भारतीय संघ ( India T20 WorldCup squad) - आघाडीची फळी - विराट कोहली, रोहित शर्मा, लोकेश राहुल; मधली फळी - सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन; अष्टपैलू खेळाडू - हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल; फिरकीपटू - राहुल चहर, आर अश्विन, वरुण चक्रवर्थी; जलदगती गोलंदाज - जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - शार्दूल ठाकूर, श्रेयस अय्यर, दीपक चहर; संघात स्थान न मिळालेले खेळाडू - पृथ्वी शॉ, शिखर धवन, कृणाल पांड्या, युझवेंद्र चहल व वॉशिंग्टन सुंदर.