Join us  

T20 World Cup, IND vs ENG SF Live : इंग्लंडने नाणेफेक जिंकली; टीम इंडियाला आयती संधी दिली, जाणून घ्या प्लेइंग इलेव्हन

T20 World Cup, India vs England Semi Final Live :  पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 1:04 PM

Open in App

T20 World Cup, India vs England Semi Final Live : पाकिस्तानने अनपेक्षित कामगिरी करताना ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये प्रवेश केला. आज भारत-इंग्लंड यांच्यातल्या सामन्यातून जेतेपदाचा दुसरा दावेदार ठरणार आहे. क्रिकेट चाहत्यांना पुन्हा एकदा India vs Pakistan असा ड्रिम सामना पाहायचा आहे. त्यामुळेच आजच्या सामन्याकडे सर्वांच्या नजरा खिळल्या आहेत. India vs England यांची लढत एडिलेड ओव्हलवर होणार आहे, परंतु काल येथे रात्रभर वादळी वारा अन् मुसळधार पाऊस पडला आहे. पण, सध्यातरी पावसाची शक्यता दिसत नाही..

T20 World Cup Final : वर्ल्ड कप फायनल ना रविवारी, ना सोमवारी होणार; जेतेपद विभागून दिले जाणार? ICC ने दिले महत्त्वाचे अपडेट्स

आताचा तेथील हवामानाचा अंदाज पाहता सध्यातरी तेथे ढगाळ वातावरण नाही. गारवा जाणवतोय. तेथील किमान तापमान १७ डिग्री सेल्सिअस आहे आणि कमाल तापमान २६ डिग्री सेल्सिअस आहे. सकाळी पावसाच्या हलक्या सरी येऊन गेल्या. दुपारी पावसाचा अंदाज नाहीच आहे. ऑस्ट्रेलियातील वेळेनुसार IND vs ENG सामना सायंकाळी ६.३० वाजता होणार आहे. त्यामुळे संध्याकाळचा हवामानाचा अंदाज पावसाची शक्यता २० टक्के असल्याचा वर्तवत आहे.  

इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. डेव्हिड मलान व मार्क वूड हे मुख्य खेळाडू इंग्लंडच्या संघात आज खेळणार नाहीत. ख्रिस जॉर्ड व फिल सॉल्ट यांना संधी मिळाली आहे. इंग्लंडने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेऊन भारताच्या हातात आयतं कोलीत दिलं. रिषभ पंतला संघात कायम राखले आहे भारतीय संघात बदल करण्यात आलेला नाही. एडिलेडवर आतापर्यंत नाणेफेक जिंकलेल्या एकाही संघाला विजय मिळवता आलेला नाही. ११ सामन्यांत नाणेफेक जिंकलेला संघच पराभूत झाला आहे आणि त्यामुळे भारताचे स्टार चांगले आहेत.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२भारत विरुद्ध इंग्लंड
Open in App