T20 World Cup, IND vs NAM Live Update : आम्ही माणसं आहोत, पेट्रोल भरलं अन् गाडी पळवली असं होत नाही; रवी शास्त्रींनी अखेरच्या सामन्यात घेतला पंगा, बघा काय म्हणाले

Ravi Shastri on Bubble Fatigue   रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय,  तर ६४  ट्वेंटी-२०त ४२ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 08:08 PM2021-11-08T20:08:51+5:302021-11-08T20:11:16+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, India vs Namibia Live Update : Ravi Shastri said, "We would've liked a bigger gap between the IPL and the T20 World Cup" | T20 World Cup, IND vs NAM Live Update : आम्ही माणसं आहोत, पेट्रोल भरलं अन् गाडी पळवली असं होत नाही; रवी शास्त्रींनी अखेरच्या सामन्यात घेतला पंगा, बघा काय म्हणाले

T20 World Cup, IND vs NAM Live Update : आम्ही माणसं आहोत, पेट्रोल भरलं अन् गाडी पळवली असं होत नाही; रवी शास्त्रींनी अखेरच्या सामन्यात घेतला पंगा, बघा काय म्हणाले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Namibia Live Update : भारतीय संघ ट्वेंटी-२० क्रिकेटमधील आज अखेरचा सामना खेळत आहे. पाकिस्तान व न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानं टीम इंडियाचं उपांत्य फेरीत जाण्याचं आव्हान संपुष्टात आलं. त्यामुळे कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात जेतेपद पटकावण्याचं विराट कोहलीचं स्वप्न अपुरं राहिलं. याचसोबत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचाही मुख्य प्रशिक्षक म्हणून हा अखेरचा सामना आहे. यानंतर भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या खांद्यावर असणार आहे. शास्त्रींनी नामिबियाविरुद्धच्या लढतीपूर्वी स्टार स्पोर्ट्स वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट मत मांडताना BCCI  व ICC ला काही सल्ले दिले.

Indian Players are Mentally And Physically Drained: Ravi Shastri on Bubble Fatigue   रवी शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली भारतानं ४३ कसोटींत २५ विजय व १३ पराजय पत्करले आहेत. ५ सामने बरोबरीत सुटले. ७६ वन डे पैकी ५१ विजय , २२ पराजय,  तर ६४  ट्वेंटी-२०त ४२ विजय व १८ पराजय असा शास्त्री यांचा प्रशिक्षक म्हणून प्रवास आहे. त्यांच्या कार्यकाळात टीम इंडियानं दोन वेळा ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरच्या मैदानावर कसोटी मालिकेत धुळ चारली. ७० वर्षांनंतर भारतीय संघआनं ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि अशी कामगिरी करणारा तो पहिला आशियाई संघ ठरला. ४० महिने भारतीय संघ कसोटी क्रिकेटमध्ये अव्वल स्थानावर होता. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया येथे मर्यादित षटकांची मालिका जिंकण्याचा पराक्रम.

रवी शास्त्री काय म्हणाले? 
''सलग सहा महिने बायो बबलमध्ये राहुन भारतीय खेळाडू मानसिक आणि शारीरिक दृष्टीनं थकले आहेत. मी मानसिक दृष्टीनं थकलोय, परंतु खेळाडू मानसिक व शारीरिक दृष्टीनं थकले. आयपीएल २०२१ आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत थोडासा अधिक गॅप असायला हवा होता. पराभवासाठी मी ही कारणं देत नाही. पराभवाला आम्ही कधी घाबरलो नाही,'' असे रवी शास्त्री म्हणाले.

५९ वर्षीय शास्त्री यांनी मुख्य प्रशिक्षक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ अविश्वसनीय होता असे सांगितले. ते म्हणाले,''हा प्रवास फनटास्टीक होता. जेव्हा मी ही जबाबदारी स्वीकारली, तेव्ही मी मनातल्या मनात ठरवलं की, मला काहीतरी वेगळं करायचं आहे आणि तसं करण्यात यशस्वी ठरलोय, असं मला वाटतं. तुम्ही किती यश मिळवता यापेक्षा, तुम्ही कठीण प्रसंगांवर कशी मात करता, हे कधीकधी आयुष्यात महत्त्वाचे असते. मागील पाच वर्षांत या खेळाडूंनी ते करून दाखवलं आहे. जगातल्या सर्व कोपऱ्यात तिन्ही फॉरमॅटमध्ये या खेळाडूंनी वर्चस्व गाजवलं. त्यामुळे क्रिकेटच्या इतिहासात हा संघ सर्वोत्तम संघांपैकी एक ठरतो.''

'' राहुल द्रविडला वारशात एक सर्वोत्तम संघ मिळाला आहे. विराट कोहलीसारखा सीनियर खेळाडू संघात असताना टीम इंडियावर बदलाचा परिणाम होणार नाही. राहुल द्रविडच्या अनुभवाचा संघाला फायदा मिळेल आणि येणाऱ्या काळात तो टीम इंडियाला आणखी चांगलं तयार करेल. विराट कोहलीनं कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली आहे आणि तो कसोटी क्रिकेटमधील  ambassadors पैकी एक आहे,''असे म्हणताना शास्त्री यांनी पुन्हा बायो बबलचा मुद्दा उपस्थित केला आणि म्हणाले आम्ही माणसं आहोत, गाडी नाही की पेट्रोल भरलं आणि सुरू झालो...

Web Title: T20 World Cup, India vs Namibia Live Update : Ravi Shastri said, "We would've liked a bigger gap between the IPL and the T20 World Cup"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.