T20 World Cup, India vs Namibia Live Update : विराट कोहली ( Virat Kohli) आणि रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा अनुक्रमे कर्णधार व मुख्य प्रशिक्षक म्हणून आजचा सामना अखेरचा आहे. भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आज नामिबियाविरुद्ध अखेरचा साखळी सामना खेळत आहे. उपांत्य फेरीतील आव्हान आधीच संपुष्टात आल्यामुळे टीम इंडिया औपचारिकता म्हणून मैदानावर उतरली. कर्णधार म्हणून अखेरच्या व ५० व्या ट्वेंटी-२० सामन्यात विराटनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. आर अश्विन ( R Ashwin) आणि रवींद्र जडेजा ( Ravindra Jadeja) यांनी हा निर्णय योग्य ठरवताना नामिबियाला धक्के दिले. पण, या सामन्यात टीम इंडियाचे खेळाडू दंडावर काळ्या फिती बांधून आल्यानं फॅन्स टेंशनमध्ये आले. भारतीय क्रिकेटला अनेक महान क्रिकेटपटू देणारे प्रशिक्षक तारक सिन्हा ( Tarak Sinha) यांना श्रंद्धाजली म्हणून भारतीय खेळाडूंनी ही काळी फित बांधली. द्रोणाचार्य पुरस्कार विजेते सिन्हा यांचं शनिवारी निधन झालं.
तारक सिन्हा दिल्लीत सोनेट क्रिकेट क्लब चालवत होते. बीसीसीआयनं ट्विट केलं की,''भारतीय खेळाडू आज द्रोणाचार्य पुरस्कार विजेते प्रशिक्षक तारक सिन्ही यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दंडावर काळ्या फिती बांधून मैदानावर उतरले आहेत.''
तारक यांनी भारताला १२ आंतरराष्ट्रीय खेळाडू दिले. सध्याच्या भारतीय संघातील यष्टिरक्षक- फलंदाज रिषभ पंत हा तारक सरांचाच विद्यार्थी. पंतशिवाय शिखर धवन, आकाश चोप्रा, आशिष नेहरा, अतुल वासन, संजीव शर्मा, केपी भस्कर, अजय शर्मा, मनोज प्रभाकर, रमण लांबा, रंधीर सिंह, सुरिंदर खन्ना हेही तारक संघाचे विद्यार्थी आहेत. महिला क्रिकेटपटू अंजुन चोप्रा हिचेही ते प्रशिक्षक होते. तारक यांनी दिल्ली संघालाही प्रशिक्षण दिले आहे आणि त्यांच्या प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात दिल्लीनं रणजी करंडक उंचावला होता.
नामिबियाची कडवी झुंज; आर अश्विन, रवींद्र जडेजाची भन्नाट कामगिरी
प्रथम फलंदाजीला आलेल्या नामिबियानं धक्के बसूनही २० षटकं खेळून काढताना ८ बाद १३२ धावा केल्या. आर अश्विन ( ३-२०) व रवींद्र जडेजा ( ३-१६ ) यांनी दमदार कामगिरी केली. रोहित शर्मानं भन्नाट कॅच घेतला. जसप्रीत बुमराहनं १९ धावांत २ विकेट्स घेतल्या. मोहम्मद शमी ( ३९ धावा) व राहुल चहर ( ३० धावा) हे महागडे गोलंदाज ठरले.
Web Title: T20 World Cup, India vs Namibia Live Update : Team India is wearing black armbands today to pay their tributes to Dronacharya Awardee and widely respected coach Tarak Sinha
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.