T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

T20 World Cup, India vs Namibia Live Update : जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेली टीम इंडिया प्रत्यक्ष स्पर्धेत अपयशी ठरली ...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 8, 2021 07:06 PM2021-11-08T19:06:39+5:302021-11-08T19:07:15+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, India vs Namibia Live Update : Virat Kohli to captain Team India for one final time in T20I, which is also his 50th as Captain in this format, India have won the toss | T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

T20 World Cup, IND vs NAM Live Update : कर्णधार म्हणून अखेरच्या सामन्यात विराट कोहलीनं जिंकली नाणेफेक, संघात केला एक बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Namibia Live Update : जेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर असलेली टीम इंडिया प्रत्यक्ष स्पर्धेत अपयशी ठरली आणि अखेरचा साखळी सामना खेळण्यापूर्वीच उपांत्य फेरीच्या शर्यतीतून बाहेर गेली. पाकिस्तान, न्यूझीलंड यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचे आव्हान जवळपास संपुष्टात आले होते. उरल्या होत्या फक्त आशा, परंतु त्याही न्यूझीलंडच्या अफगाणिस्तानवरील विजयानं मावळून टाकल्या. त्यामुळे आजचा भारत विरुद्ध नामिबिया हा सामना केवळ औपचारिकता आहे. आजचा सामना हा मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri), भरत अरूण, आर श्रीधर या मंडळींचा टीम इंडियासोबचा अखेरचा सामना आहे.  विराट कोहली ( Virat Kohli) याचाही ट्वेंटी-२० संघाचा कर्णधार म्हणून अखेरचा सामना आहे. वर्ल्ड कपनंतर या पदावरून पायउतार होण्याची घोषणा विराटनं आधीच केली होती. 

स्कॉटलंडविरुद्धचा एक विजय सोडला तर नामिबियाच्या हाती फारसे काही लागले नाही. तरी सुद्धा आजच्या सामन्यासह या स्पर्धेतून घेतलेला अनुभव नामिबियाला भविष्यात निश्चितच उपयोगी पडणार आहे. या सामन्यात काही नव्या खेळाडूंसह नामिबिया मैदानात उतरू शकते. भारतासारख्या मातब्बर प्रतिस्पर्ध्याला कडवे आव्हान देण्याचा नामिबियाचा प्रयत्नही करेल. मात्र, यासाठी त्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्येक विभागात उत्तम खेळ करणे क्रमप्राप्त आहे. आजचा सामना ही औपचारिकता असली तरी दोन्ही संघ आपल्या सन्मानासाठी हा सामना जिंकण्याचा निश्चितच प्रयत्न करतील. 

विराट कोहलीनं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात आज एक बदल पाहायला मिळत आहे. वरूण चक्रवर्थीच्या जागी  राहुल चहरला आज संधी मिळाली आहे. 
 

Web Title: T20 World Cup, India vs Namibia Live Update : Virat Kohli to captain Team India for one final time in T20I, which is also his 50th as Captain in this format, India have won the toss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.