India vs Pakistan लढतीपूर्वी आयसीसीनं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, यंदा तरी टीम इंडियाची लाट रोखणार का?; थेट विचारलं, Video

T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली ही चाहत्यांसाठी पर्वणीच..

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2021 04:33 PM2021-10-24T16:33:16+5:302021-10-24T16:34:21+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, India vs Pakistan : 5-0 - Will Pakistan turn the tide in today's clash in Dubai?, know INDvsPAK T20IWC history, Video | India vs Pakistan लढतीपूर्वी आयसीसीनं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, यंदा तरी टीम इंडियाची लाट रोखणार का?; थेट विचारलं, Video

India vs Pakistan लढतीपूर्वी आयसीसीनं पाकिस्तानच्या जखमेवर मीठ चोळलं, यंदा तरी टीम इंडियाची लाट रोखणार का?; थेट विचारलं, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच म्हटली ही चाहत्यांसाठी पर्वणीच.. हातातलं सर्व काम सोडून टीव्हीसमोर नख कुरतडत बसणे, विकेट गेल्यावर प्रतिस्पर्धी गोलंदाजाला शिव्या घालणे, चौकार-षटकाराला भन्नाट डान्स करणे अन् विजयानंतर कुठे टीव्ही फोडणे, तर कुठे विजयाचा जल्लोष करणे... त्यामुळे जगभरातील क्रिकेट चाहत्यांना India vs Pakistan लढतीची प्रतीक्षा आहे. दरम्यान, या लढतीपूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ICC पाकिस्तान संघाच्या जखमेवर मीठ चोळलं आहे..  ( सामन्याचं संपूर्ण धावफलक)

भारत-पाकिस्तान वर्ल्ड कप लढतीत टीम इंडिया अपराजित

  • २००७ मच्या वर्ल्ड कप स्पर्धेत भारत-पाकिस्तान दोन वेळा समोरासमोर आले होते. साखळी फेरीतल्या पहिल्या सामन्यात भारताच्या ९ बाद १४१ धावांच्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १४१ धावा करू शकला. त्यामुळे सामना टाय झाला आणि बॉल आउटमध्ये भारताने ३-० ने बाजी मारली. T20 World Cup 2021, T20 World Cup 2021 matches 
  • २००७ वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत भारताने पाकिस्तानला पराभूत करत चषकावर नाव कोरलं होतं. पाकिस्तानला १५८ धावांचं लक्ष्य दिल्यानंतर भारतीय संघाने अंतिम सामना ५ धावांनी जिंकला होता. अखेरच्या षटकात जोगिंदर सिंगच्या गोलंदाजीवर एस श्रीसंतनं झेल घेत भारताचा विजय पक्का केला होता. T20 World Cup 2021 live updates, T20 World Cup 2021 schedule
  • २०१२च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर १२८ धावांचं लक्ष्य ठेवलं आणि टीम इंडियानं २ विकेट्स गमावत हे लक्ष्य सहज पार केलं. २०१४ मध्ये भारताने ७ विकेट्स राखून विजय मिळवला होता. पाकिस्तानचे ७ बाद १३० धावांचं आव्हान  भारताने ३ विकेट्स गमावून पार केलं.  T20 World Cup 2021 live matches, Ind vs Pak live match
  • २०१६मध्ये कोलकाताच्या ईडन गार्डनवर पाकिस्ताननं विजयासाठी ठेवलेलं ११९ धावांचं आव्हान भारताने ६ विकेट्स राखून पार केलं. 

 

आयसीसीनं त्याचीच उजळणी करणारा व्हिडीओ पोस्ट केला. 


 

Web Title: T20 World Cup, India vs Pakistan : 5-0 - Will Pakistan turn the tide in today's clash in Dubai?, know INDvsPAK T20IWC history, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.