Join us  

T20 World Cup, India vs Pakistan : पाकिस्तानचा कर्णधार Babar Azamचं खुलं चॅलेंज; म्हणाला, यावेळी भारताला पराभूत करणार 

T20 World Cup, India vs Pakistan, Babar Azam : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने झालेत आणि त्यात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2021 3:27 PM

Open in App

T20 World Cup, India vs Pakistan : भारत-पाकिस्तान यांच्यात होणाऱ्या सामन्याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. २४ ऑक्टोबर दुबई इंटरनॅशनल स्टेडियमवर हा महामुकाबला होणार आहे. आतापर्यंत वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघानेच बाजी मारली आहे आणि त्यामुळे याही सामन्यात टीम इंडियाचीच बाजू वरचढ आहे. पण, पाकिस्तानचा कर्णधार बाबर आजम ( Babar Azam) यानं India vs Pakistan यांच्यातल्या सामन्यापूर्वी टीम इंडियाला खुलं आव्हान दिलं आहे. पाकिस्तानच्या कर्णधारानं यावेळी इतिहास बदलणार आणि भारताला पराभूत करणार अशी बतावणी केली आहे. 

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने झालेत आणि त्यात पाकिस्तानला पराभवाचे तोंड पहावे लागले आहे. याहीआधी पाकिस्तानच्या आजी-माजी खेळाडूंकडून अनेकदा दावे केले गेले आणि त्यांना तोंडावर आपटावे लागले होते. तसे दावे आताही केले जात आहेत. शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर पासून ते बाबर या सर्वांच्या मते यंदा पाकिस्तान इतिहास घडवणार आहे. टीम इंडियालाच नव्हे तर यंदा पाकिस्तानच जेतेपद पटकावेल, असा दावा करण्यात आला आहे. त्यात India vs Pakistan सामन्याच्या तोंडावर बाबर आजमनं चॅलेंज देऊन टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला डिवचले आहे. 

भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी बाबरनं संघाची तयारी व रणनीती संबंधित प्रश्नांची उत्तरं दिली. बाबरला पहिलाच प्रश्न भारताविरुद्धच्या सामन्यावर विचारण्यात आला. त्यावर तो म्हणाला,'' इतिहास हा इतिहास झाला. आम्ही पुढचा विचार करत आहोत आणि विजयाचा निर्धार करूनच मैदानावर उतरणार आहोत.'' या सामन्याबद्दलच्या रणनीतीबाबतही बाबर म्हणाला,''आम्ही आतापर्यंत जसं खेळत आलोय, तसंच क्रिकेट खेळणार. मांइडसेटसाठी रणनीती तयार केली आहे. दडपणावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यावर लक्ष असेल. स्वतःला शांत ठेऊन संघाला विजय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.भूतकाळात काय घडलं याचा विचार करत नसून इतिहास घडवण्याचा विचार करतोय. '' 

पाहा व्हिडीओ 

भारत - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी 

पाकिस्तान - बाबर आझम, आसीफ अली, मोहम्मद हाफिज, शोएब मलिक, मोहम्मद रिझवान, इमाद वासीम, मोहम्मद नवाझ, मोहम्मद वासीम, शाबाद खान, हॅरीस रौफ, हसन अली, शाहिन शाह आफ्रिदी, सर्फराज अहमद, हैदर अली व फाखर झमान 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१भारत विरुद्ध पाकिस्तानबाबर आजमविराट कोहली
Open in App