T20 World Cup, India vs Pakistan : भारत आणि पाकिस्तान हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकमेकांना भिडणार आहेत. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर हा सामना होणार आहे आणि यावेळी २० हजारापर्यंत प्रेक्षकही उपस्थित राहणार आहेत. आयसीसीनं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर केलं, तेव्हापासून २४ ऑक्टोबरची सारेच प्रतीक्षा करत होते आणि अखेर तो दिवस उजाडला. पण, मैदानावर एकमेकांना भिडण्यापूर्वी India-Pakistan चे खेळाडू आयसीसी क्रिकेट अकादमीत एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी दोन्ही देशांच्या चाहत्यांनी आपापल्या खेळाडूंना चिअर केले.
पाहा व्हिडीओ...
या लढतीपूर्वी दोन्ही संघाचे कर्णधार काय म्हणाले?
- पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेतील इतिहासाबद्दल आम्ही चर्चा करत नाही. आमच्यासाठी येणारा दिवस महत्त्वाचा आहे. आम्ही त्या सामन्यांत चांगला खेळ केला आणि म्हणून विजय मिळवला. पाकिस्तान हा तगडा संघ आहे आणि त्यांच्याकडे प्रतिभावान खेळाडू आहेत. अशा संघाविरुद्ध खेळताना चांगली रणनीती आखायला हवी आणि त्याचा अवलंबही व्हायला हवा- विराट कोहली
- इतिहास हा इतिहास झाला. आम्ही पुढचा विचार करत आहोत आणि विजयाचा निर्धार करूनच मैदानावर उतरणार आहोत.'' या सामन्याबद्दलच्या रणनीतीबाबतही बाबर म्हणाला,''आम्ही आतापर्यंत जसं खेळत आलोय, तसंच क्रिकेट खेळणार. मांइडसेटसाठी रणनीती तयार केली आहे. दडपणावर नियंत्रण कसं मिळवता येईल, यावर लक्ष असेल. स्वतःला शांत ठेऊन संघाला विजय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न असेल.भूतकाळात काय घडलं याचा विचार करत नसून इतिहास घडवण्याचा विचार करतोय- बाबर आजम