T20 World Cup : मोहम्मद शमी वर्ल्ड कप खेळणार की नाही? समोर आले मोठे अपडेट्स, BCCI ने घेतला निर्णय

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून BCCI ला वर्षभर ट्वेंटी-२० पासून दूर असलेल्या मोहम्मद शमीची ( Mohammed Shami) आठवण झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2022 04:10 PM2022-09-28T16:10:37+5:302022-09-28T16:12:56+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup : Indian bowler Mohammed Shami provides a major update on his Covid situation, shares report on Instagram, to undergo cardiovascular test this week | T20 World Cup : मोहम्मद शमी वर्ल्ड कप खेळणार की नाही? समोर आले मोठे अपडेट्स, BCCI ने घेतला निर्णय

T20 World Cup : मोहम्मद शमी वर्ल्ड कप खेळणार की नाही? समोर आले मोठे अपडेट्स, BCCI ने घेतला निर्णय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

आशिया चषक २०२२ स्पर्धेतील भारतीय गोलंदाजांची कामगिरी पाहून BCCI ला वर्षभर ट्वेंटी-२० पासून दूर असलेल्या मोहम्मद शमीची ( Mohammed Shami) आठवण झाली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप प्लानमध्ये नसल्याचे सांगणाऱ्या BCCI ने शमीची राखीव खेळाडू म्हणून निवड केली. तसेच ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेसाठी त्याची मुख्य संघात निवड केली. पण, माशी शिंकली अन् ऑसी मालिकेपूर्वी शमीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. त्यामुळे त्याला या मालिकेतून माघार घ्यावी लागली. आता तो आफ्रिकेविरुद्धची मालिकाही खेळणार नाही. त्यामुळे ट्वेंटी-२० वर्ल्ड कप पर्यंत तरी तो फिट होईल का अशी शंका निर्माण झाली आहे. अर्थात वर्ल्ड कपला अद्याप बराच वेळ आहे, परंतु पुढील आठवड्यात संघ ऑस्ट्रेलियासाठी रवाना होणार आहे.

काही वेळापूर्वीच BCCI चे सचिव जय शाह यांनी मोहम्मद शमी कोरोनातून पूर्णपणे बरा झाला नसूत तो आफ्रिकेविरुद्धच्या तीन ट्वेंटी-२० सामन्यांत खेळणार नसल्याचे जाहीर केले. त्यामुळेच आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेत शमीच्या जागी  उमेश यादवची आणि दीपक हुड्डाच्या जागी श्रेयस अय्यरची निवड झाली आहे. शाहबाज अहमदचाही या मालिकेसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. मात्र, मोहम्मद शमीने स्वतः त्याच्या कोरोना बाबतची अपडेट्स इस्टा स्टोरीच्या माध्यमातून दिले आहेत. शमीने त्याचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आल्याचे जाहीर केले. पण, शमीला फिटनेस टेस्ट द्यावी लागणार आहे.

भारतीय संघ - रोहित शर्मा, लोकेश राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, दिनेश कार्तिक, आर अश्विन, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंग, हर्षल पटेल, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, उमेश यादव, श्रेयस अय्यर, शाहबाज अहमद ( India squad for South Africa T20Is: Rohit Sharma (Captain), KL Rahul (vice-captain), Virat Kohli, Suryakumar Yadav, Rishabh Pant (wicket-keeper), Dinesh Karthik (wicket-keeper), R. Ashwin, Yuzvendra Chahal, Axar Patel, Arshdeep Singh, Harshal Patel, Deepak Chahar, Jasprit Bumrah, Umesh Yadav, Shreyas Iyer, Shahbaz Ahmed.) 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका मालिका-

पहिला T20 - २८ सप्टेंबर (तिरुवनंतपुरम)
दुसरी T20 - २ ऑक्टोबर (गुवाहाटी)
तिसरी T20 - ४ ऑक्टोबर (इंदूर)

Web Title: T20 World Cup : Indian bowler Mohammed Shami provides a major update on his Covid situation, shares report on Instagram, to undergo cardiovascular test this week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.