Join us  

T20 World Cup, IRE vs SCOT : भावनांचा पूर वाहू लागला! आयर्लंडने वर्ल्ड कपमध्ये अविश्वसनीय विजय मिळवला, विंडीजचं वाढवलं टेंशन

T20 World Cup, IRE vs SCOT : आयर्लंड संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अविश्वसनीय विजयाची नोंद केली.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2022 1:26 PM

Open in App

T20 World Cup, IRE vs SCOT : आयर्लंड संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत बुधवारी अविश्वसनीय विजयाची नोंद केली.  ब गटातील पहिल्याच सामन्यात झिम्बाब्वेकडून हार मानावी लागल्यानंतर आयर्लंडला आजचा सामना जिंकणे महत्त्वाचे होते. पण, स्कॉटलंडने ज्यांनी वेस्ट इंडिजसारख्या दोन वेळच्या विजेत्यांना नमवले त्यांचे आव्हान आयर्लंडसमोर होते. स्कॉटलंडच्या फलंदाजांनी त्यांची जबाबदारी चोख बजावताना तगडे लक्ष्य उभे केले. गोलंदाजांनीही लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या आयर्लंडला ६१ धावांवर ४ धक्के दिले. पण, त्यानंतर कर्टीस कॅम्फेर ( Curtis Campher) आणि जॉर्ज डॉक्रेल ( George Dockrell) यांनी विक्रमी भागीदारी केली व आयर्लंडचे स्पर्धेतील आव्हान कायम राखले. आयर्लंडच्या या विजयाने वेस्ट इंडिडचे टेंशन मात्र वाढवले आहे.

T20 World Cup, IND vs NZ : भारत-न्यूझीलंड सामना रद्द होण्याच्या मार्गावर, समोर आले महत्त्वाचे अपडेट्स 

प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडने ५ बाद १७६ धावा केल्या. जॉर्ज मुन्सी ( १) लगेच माघारी परतल्यानंतर मिचेल जॉन्सने सहकाऱ्यांना सोबत घेऊन स्कॉटलंडला समाधानकारक पल्ला गाठून दिला. मॅथ्यू क्रॉस ( २८), कर्णधार रिची बेरींग्टन ( ३७) यांनी सुरेख साथ दिली. जॉन्सने ५५ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांसह ८६ धावा केल्या. आयर्लंडच्या कर्टीस कॅम्फेरने २-०-९-२ अशी उल्लेखनीय गोलंदाजी केली. १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आयर्लंडने ६१ धावांत ४ फलंदाज गमावले, परंतु त्यानंतर स्कॉटलंडच्या गोलंदाजांना विकेट घेता आली नाही.

कॅम्फेर व डॉक्रेल यांनी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासात लक्ष्याचा पाठलाग करताना पाचव्या विकेटसाठी सर्वाधिक ११९ धावांची विक्रमी भागीदारी केली.  कॅम्फेरने ३२ चेंडूंत ७ चौकार व २ षटकारांच्या मदतीने नाबाद ७२ धावा केल्या, तर डॉक्रेलने २७ चेडूंत नाबाद ३९ धावा केल्या. आयर्लंडने १९ षटकांत ४ बाद १८० धावा करून विजय मिळवला. आयर्लंडच्या विजयाने झिम्बाब्वे अव्वल स्थानी सरकला, तर स्कॉटलंडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली. ब गटात आयर्लंडसह या दोन्ही संघांच्या खात्यात आता प्रत्येकी २ गुण आहेत. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२आयर्लंड
Open in App