T20 World Cup, IRE vs SL : आयर्लंडने कोरोना पॉझिटिव्ह ऑल राऊंडर मैदानावर उतरवला, श्रीलंकेसमोर सन्मानजनक स्कोअर उभा केला

T20 World Cup, Ireland vs Sri Lanka Live : यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत असा वाद टाळण्यासाठी ICCनेच नियम केला आणि कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळू शकतो असा नियम बनवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2022 11:17 AM2022-10-23T11:17:53+5:302022-10-23T11:18:36+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, IRE vs SL : Ireland all-rounder George Dockrell will take the field in their Super 12 stage opener with Sri Lanka despite he tested positive for Covid-19; Sri Lanka need 129 to win  | T20 World Cup, IRE vs SL : आयर्लंडने कोरोना पॉझिटिव्ह ऑल राऊंडर मैदानावर उतरवला, श्रीलंकेसमोर सन्मानजनक स्कोअर उभा केला

T20 World Cup, IRE vs SL : आयर्लंडने कोरोना पॉझिटिव्ह ऑल राऊंडर मैदानावर उतरवला, श्रीलंकेसमोर सन्मानजनक स्कोअर उभा केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Ireland vs Sri Lanka Live : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या महिला वर्ल्ड कप स्पर्धेत यजमान संघाने कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळवल्याने बरीच चर्चा रंगली होती. भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने मनाचा मोठेपणा दाखवून ऑसींच्या त्या खेळाडूच्या खेळण्यावर हरकत घेतली नाही. पण, यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत असा वाद टाळण्यासाठी ICCनेच नियम केला आणि कोरोना पॉझिटिव्ह खेळाडू खेळू शकतो असा नियम बनवला. त्यानुसारच आयर्लंडने सुपर १२मधील श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात कोरोना पॉझिटिव्ह अष्टपैलू खेळाडूला मैदानावर उतरवले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी चांगली कामगिरी करताना आयर्लंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले आहे.

भारत-पाकिस्तान सामना झालाच नाही, तर...? जाणून घ्या Point Table वर कसा होईल परिणाम


आयर्लंडचा अष्टपैलू खेळाडू जॉर्ज डॉक्रेल ( Ireland all-rounder George Dockrell) याचा कोरोना रिपोर्ट संभाव्य सकारात्मक आला असल्याचे क्रिकेट आयर्लंडने मान्य केले. पण, आयसीसीच्या सध्याच्या नियमानुसार कोरोना पॉझिटिव्ह खेळाडूला खेळण्यापासून रोखू जाऊ शकत नाही, परंतु त्याला संघाच्या अन्य खेळाडूंपासून दुरावा बनवून ठेवावा लागेल.  डॉक्रेल याच्या अहवालात सौम्य लक्षण असल्याचे दिसतेय आणि त्यामुळे त्याला आयर्लंडने मैदानावर उतरवले. त्याने आज १६ चेंडूंत १४ धावांचे योगदान दिले.  


दरम्यान, प्रथम फलंदाजी करणाऱ्या आयर्लंडला ८ बाद १२८ धावा करता आल्या. हॅरी टेक्टरने सर्वाधिक ४५ आणि पॉल स्टर्लिंगने ३४ धावांचे योगदान दिले. श्रीलंकेच्या गोलंदाजांनी उत्तम कामगिरी केली. वनिंदू हसरंगा ( २-२५) व महिषा थिक्साना ( २-१९) यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. बिनुरा फर्नांडो, लाहिरु कुमारा, चमिका करुणारत्ने व धनंजया डि सिल्वा यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, IRE vs SL : Ireland all-rounder George Dockrell will take the field in their Super 12 stage opener with Sri Lanka despite he tested positive for Covid-19; Sri Lanka need 129 to win 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.