T20 World Cup, For sake of team, ‘mentor’ MS Dhoni becomes ‘throw down specialist’: भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप संघातील मोहिमेला २४ ऑक्टोबरपासून सुरूवात होणार आहे. रविवारी India vs Pakistan हा कट्टर सामना रंगणार आहे आणि त्यासाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहे. विराट कोहलीचे ( Virat Kohli) वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी ( MS Dhoni) मेंटॉरच्या भूमिकेत दिसत आहे. धोनीनं मेटॉर पदाचा चार्ज घेताच संघातील युवा खेळाडूंना मार्गदर्शनाला सुरुवात केली. हार्दिक पांड्या, इशान किशन आणि रिषभ पंत यांच्यासोबत धोनी नेट्समध्ये तासनतास सराव करत आहे. त्यात धोनी शुक्रवारी नव्या भूमिकेत दिसला.
बीसीसीआयनंमहेंद्रसिंग धोनीचे काही फोटो पोस्ट केले आणि त्यात तो थ्रो डाऊन स्पेशालिस्टच्या भूमिकेत दिसला. धोनी नेट्समध्ये भारतीय फलंदाजांना गोलंदाजी करत होता आणि त्याचं हे समर्पण पाहून नेटिझन्सही आनंदी झाले. मेंटॉरपदासाठी धोनीनं बीसीसीआयकडून एकही रुपया घेतलेला नाही.
भारताचा १५ सदस्यीय संघ ( India’s 15-man squad) - विराट कोहली , रोहित शर्मा, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत, इशान किशन, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, राहुल चहर, आर अश्विन, शार्दूल ठाकूर, वरुण चक्रवर्थी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी; राखीव खेळाडू - श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, दीपक चहर