T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्तानकडून अखेरचा सामना खेळणाऱ्या माजी कर्णधाराचा दोन्ही संघांकडून सन्मान; मोडला आहे महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना नामिबियासमोर तगडे आव्हान उभे केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 05:31 PM2021-10-31T17:31:41+5:302021-10-31T17:39:29+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, NAM vs AFG : Afghanistan and Namibia team, giving guard of honour to Asghar Afghan as he is playing his final International match, AFG 5/160  | T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्तानकडून अखेरचा सामना खेळणाऱ्या माजी कर्णधाराचा दोन्ही संघांकडून सन्मान; मोडला आहे महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्तानकडून अखेरचा सामना खेळणाऱ्या माजी कर्णधाराचा दोन्ही संघांकडून सन्मान; मोडला आहे महेंद्रसिंग धोनीचा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना नामिबियासमोर तगडे आव्हान उभे केले. अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असघर अफघान ( Asghar Afghan) यानं कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना नामिबियाविरुद्धची लढत ही शेवटची असेल हे स्पष्ट केले होते. युवा खेळाडूंना आपण हा निर्णय घेत असल्याचे त्यानं सांगितले. १६ वर्षांच्या कारकिर्दीत आज अखेरचा सामना खेळणाऱ्या अफघानला दोन्ही संघांनी गार्ड ऑफ ऑनर देत सन्मानित केलं. ( जाणून घ्या संपूर्ण धावफलक एका क्लिकवर


अफघाननं आजच्या सामन्यात २३ चेंडूंत ३१ धावा केल्या. हझरतुल्लाह जझाई ( ३३), मोहम्मद शाहजाद  ( ४५) व मोहम्मद नबी ( ३२*) यांनी दमदार खेळ करताना अफगाणिस्तानला ५ बाद १६० धावांचा पल्ला गाठून दिला. डावाच्या मध्यांतरात अफघान भावूक झालेला पाहायला मिळाला. अफघान म्हणाला,''मला युवा खेळाडूंना संधी द्यायची आहे आणि त्यासाठी ही योग्य वेळ होती.  आताच का, असे मला अनेक जण विचारत आहेत, परंतु यामागील काही गोष्टी मी समजावून सांगू शकत नाही. पाकिस्तानविरुद्धचा पराभव माझ्या प्रचंड जिव्हारी लागला आणि त्यामुळेच मी निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.  या संघासोबत अनेक अविस्मरणीय क्षण आहेत आणि त्यामुळेच हा निर्णय घेणं माझ्यासाठी अवघड होतं, पंरतु मला निवृत्त व्हायचं होतं.''  

अफघाननं ६ कसोटीत ४४० धावा, ११४ वन डे सामन्यांत २४२४ धावा आणि ७४ ट्वेंटी-२०त १३५१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय शतकं व १९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून सर्वाधिक ४२ विजय मिळवून महेंद्रसिंग धोनीचा ( ४१) विक्रम मोडला होता. 

Web Title: T20 World Cup, NAM vs AFG : Afghanistan and Namibia team, giving guard of honour to Asghar Afghan as he is playing his final International match, AFG 5/160 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.