Join us  

T20 World Cup, NAM vs AFG : अफगाणिस्तानच्या विजयानं वाढवलं टीम इंडियाचं टेंशन, उपांत्य फेरीच्या शर्यतीत वाढला आणखी एक स्पर्धक

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्ताननं रविवारी नामिबियावर मोठ्या फरकानं विजय मिळवताना टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2021 6:59 PM

Open in App

T20 World Cup, NAM vs AFG, Asghar Afghan : अफगाणिस्ताननं रविवारी नामिबियावर मोठ्या फरकानं विजय मिळवताना टीम इंडियाचं टेंशन वाढवलं आहे. ग्रुप २ मधील अफगाणिस्तानचा हा तीन सामन्यांतील दुसरा विजय आहे आणि चार गुणांसह त्यांनी दुसऱ्या स्थानावरील पकड मजबूत केली आहे. पाकिस्तानलाही जवळपास त्यांनी पराभवाची चव चाखवली होतीच, आसिफ अली संकटमोचकासारखा धावला नसता तर पाकिस्तानचा पराभव निश्चित झाला असता. तरीही अफगाणिस्तानचा संघ हा अन्य संघांसाठी धोकादायक ठरतोय आणि आजच्या विजयानं त्यांना उपांत्य फेरीच्या शर्यतीत अन्य स्पर्धकांपेक्षा आघाडीवर पोहोचवले आहे. 

अफगाणिस्तानचा माजी कर्णधार असघर अफघान ( Asghar Afghan) यानं कालच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करताना नामिबियाविरुद्धची लढत ही शेवटची असेल हे स्पष्ट केले होते. अफघाननं आजच्या सामन्यात २३ चेंडूंत ३१ धावा केल्या. हझरतुल्लाह जझाई ( ३३), मोहम्मद शाहजाद  ( ४५) व मोहम्मद नबी ( ३२*) यांनी दमदार खेळ करताना अफगाणिस्तानला ५ बाद १६० धावांचा पल्ला गाठून दिला. अफघाननं ६ कसोटीत ४४० धावा, ११४ वन डे सामन्यांत २४२४ धावा आणि ७४ ट्वेंटी-२०त १३५१ धावा केल्या आहेत. त्याच्या नावावर दोन आंतरराष्ट्रीय शतकं व १९ अर्धशतकांचा समावेश आहे. त्यानं ट्वेंटी-२०त कर्णधार म्हणून सर्वाधिक ४२ विजय मिळवून महेंद्रसिंग धोनीचा ( ४१) विक्रम मोडला होता. 

प्रत्युत्तरात नामिबायाची सुरुवात निराशाजनक झाली. क्रेग विलियम्स ( १), मिचेल व्हॅन लिंगेन ( ११), निकोल लॉफ्टेन-एटन ( १४), गेरहार्ड इरास्मस ( १२), झेन ग्रीन ( १) व जेजे स्मिट ( ०) हे पाच फलंदाज अवघ्या ५६ धावांवर माघारी परतले. राशिद खाननं ४ षटकांत १४ धावांत १ विकेट घेतली. डेव्हिड विज एकटा खिंड लढवताना दिसला, परंतु सहकारीच साथ देत नसल्यानं त्याचाही नाईलाज झाला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी केली. विज २६ धावांवर माघारी परतला. हमिद हसननं ४ षटकांत ९ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या. गुलबदीन नैबनं १९ धावांत २ आणि नवीन उल हसनं २६ धावांत ३ बळी टिपले. नामिबियाला २० षटकांत ९ बाद ९८ धावाच करता आल्या. अफगाणिस्ताननं हा सामना ६२ धावांनी जिंकला. 

धोक्याची घंटा...अफगाणिस्तानचा पुढील मुकाबला भारत ( ३ नोव्हेंबर) व न्यूझीलंड ( ७) यांच्याविरुद्ध होणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात टीम इंडियानं विजय मिळवला आणि जर अफगाणिस्ताननं ३ तारखेला त्यांना धक्का दिला तर नेट रन रेटच्या जोरावर ते उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर येतील. ( Another massive win for AFG make their NRR untouchable meaning that if they beat the winner of  #IND v #NZ then they will guarantee a spot in the semi finals)   

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१अफगाणिस्तान
Open in App