T20 World Cup, NAM vs IRE : नेदरलँड्सला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद करणाऱ्या नामिबायनं संघानं Round 1 मधील ग्रुप अ च्या अखेरच्या साखळी सामन्यात दमदार कामगिरी केली. Super 12 मधील अंतिम दोन संघ आज ठरणार आहेत आणि त्यातल्या पहिल्या लढतीत नामिबिया व आयर्लंड हे भिडत आहेत. नामिबियाच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा करताना संघाला विजयाच्या दिशेनं वाटचाल करून दिली आहे. आयर्लंडच्या सलामीवीरांनी पहिल्या ६ षटकांत ५५ धावा कुटल्या, परंतु नामिबियाच्या गोलंदाजांनी जबरदस्त पुनरागमन केलं. आयर्लंडच्या ८ फलंदाजांना ६३ धावांवर माघारी पाठवून नामिबियानं Super 12च्या दिशेनं मोठ पाऊल टाकले आहे.
आयर्लंडनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. शाहजा क्रिकेट स्टेडियमवर सुरू असलेल्या या लढतीत आयर्लंडच्या पॉल स्टिर्लिंग आणि केव्हीन ओ'ब्रायन या अनुभवी जोडीनं सुरेख सुरुवात करून दिली. या दोघांनी पॉवरप्लेचा पुरेपूर फायदा उचलताना ५५ धावा चोपल्या. पण, ८व्या षटकापासून आयर्लंडचा डाव गडगडला. धावफलकावर ६२ धावा असताना स्टिर्लिंग ( ३८) बेर्नार्ड स्कॉल्जच्या गोलंदाजीवर माघारी परतला. त्यानंतर ओ'ब्रायन २५ व कर्णधार अँडी बाल्बिर्नी २१ धावा करून माघारी परतले.
० बाद ६२ वरून आयर्लंडचा डाव जो गडगडला तो कुणाला सावरताच आला नाही. आयर्लंडला २० षटकांत ८ बाद १२५ धावा करता आल्या. नामिबियाच्या जॅन फ्रायलिंकनं २१ धावांत ३ विकेट्स घेतल्या. डेव्हिड विजेनं दोन, जजे स्मित व बेर्नार्ड यांनी प्रत्येकी १ विकेट घेतली. आता नामिबियाला Super 12 मध्ये एन्ट्री घेण्यासाठी १२६ धावा करायच्या आहेत.