ठळक मुद्देआयसीसी स्पर्धांमध्ये स्कॉटलंड व नामिबिया यांच्यातला सामना हा संलग्न संघांमधील दुसराच सामना आहे. यापूर्वी २०१६मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत नेपाळ आणि नामिबिया यांच्यात लढत झाली होती.
T20 World Cup, NAM vs SCO : भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान या तगड्या संघांसोबत ग्रुप २ मध्ये खेळणारे दोन कच्चे लिंबू नामिबिया व स्कॉटलंड यांच्यात आज सामना होत आहेत. नामिबियानं Round 1मध्ये नेदरलँड्सला पराभूत करून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धा इतिहासातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यानंतर त्यांनी आयर्लंडला नमवून थेट Super 12 मध्ये धडक दिली. आज Super 12 मध्ये पहिलाच सामना खेळणाऱ्या नामिबियानं जगाला आश्चर्यचकित कामगिरी केली. स्कॉटलनंडनंही Round 1मध्ये बांगलादेशला लोळवून धक्का दिला होता. पण, आज त्यांनाच धक्क्यांवर धक्के बसले. ( सामन्याचे संपूर्ण धावफलक पाहण्यासाठी क्लिक करा)
प्रथम फलंदाजीला आलेल्या स्कॉटलंडचे तीन फलंदाज पहिल्याच षटकात माघारी परतले. नामिबियाचा जलदगती गोलंदाज रुबेन ट्रम्पलमॅननं ( Ruben Trumpelmann ) यानं पहिल्याच चेंडूवर जॉर्ज मुन्सी ( ०) चा त्रिफळा उडवला. मुन्सीच्या बॅटची कड घेत चेंडू यष्टींवर आदळला. त्यानंतर रुबेननं Wide, निर्धाव अन् पुन्हा Wide असे चेंडू फेकले. पण, तिसऱ्या चेंडूवर कॅलम मॅकलीओड ( ०) यष्टिरक्षकाच्या हाती झेल देऊन माघारी परतला. पुढच्याच चेंडूवर रिची बेरींगटन ( ०) हाही बाद झाला. आयसीसी स्पर्धांमध्ये स्कॉटलंड व नामिबिया यांच्यातला सामना हा संलग्न संघांमधील दुसराच सामना आहे. यापूर्वी २०१६मध्ये १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत नेपाळ आणि नामिबिया यांच्यात लढत झाली होती.
दरम्यान, रुबेननं पहिल्याच षटकात तीन विकेट्स घेत इतिहास घडवला. पुरुष ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्या षटकात तीन विकेटस् घेणारा तो जगातील पहिलाच गोलंदाज ठरला.
Web Title: T20 World Cup, NAM vs SCO : Ruben Trumpelmann becomes the first ever bowler to take 3 or more wickets in the first over of a men's T20I match
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.