दुबई - ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० विश्वचषकासाठी पंच आणि सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेल्सची घोषणा झाली आहे. काही दिवसांवर आलेल्या या स्पर्धेत एकूण २० मॅच ऑफिशियल्स आपल्या सेवा देणार आहेत. त्यामध्ये केवळ एका भारतीय पंचाचा समावेश आहे.
आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार या विश्वचषकामध्ये एकूण १६ पंच आणि चार सामनाधिकारी सेवा देतील. त्यामध्ये रिचर्ड कॅटलब्रो, नितीत मेनन, कुमार धर्मसेना आणि मॉरिस एरास्मस यांचा समावेश आहे. २०२१ च्या विश्वचषकात पंच म्हणून काम पाहिलेल्या सर्व पंचांना या विश्वचषकासाठीही संधी देण्यात आली आहे. १६ पंचांसोबतट ४ सामनाधिकारीही नियुक्त करण्यात आले आहेत. त्यामध्ये रंजन मदुगुले, अँड्र्यू पायक्राफ्ट, ख्रिस ब्रॉड आणि डेव्हिड बून यांचा समावेश आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषकासाठी नियुक्त मॅच ऑफिशियल्स पुढील प्रमाणे आहेतसामनाधिकारी - अँड्रयू पायक्राफ्ट, ख्रिस ब्रॉड, डेव्हिड बून, रंजन मदुगुलेपंच - अॅडन होल्डस्टॉक, अलीम दार, अहसान रजा, ख्रिस ब्राउन, ख्रिस गेफ्नी, जोईल विल्सन, कुमार धर्मसेना, लेंग्टन रसेर, मॉरिस इरास्मस, मायकल गॉ, नितीन मेनन, पॉल रायफल, पॉल विल्सन, रिचर्ड इंलिंगवर्थ, रिचर्ड कॅटलब्रो, रॉडनी टकर.