T20 World Cup, NEW ZEALAND V NAMIBIA : भारतीय संघाचे उपांत्य फेरीचे स्थान आता अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. पाकिस्तान, न्यूझीलंडकडून पराभव पत्करणाऱ्या टीम इंडियानं तिसऱ्या लढतीत अफगाणिस्तानवर विजय मिळवला. टीम इंडियानं सांघिक खेळ करताना अफगाणिस्तानवर ६६ धावांनी विजय मिळवत नेट रन रेट -१.६०९ वरून ०.०७३ असा सुधारला. पण, तरीही त्यांचे भवितव्य अन्य संघावर अवलंबून आहेच. स्कॉटलंडचे खेळाडू न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात, भारतीयांचा आपल्याला पाठिंबा आहे, असे सांगतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यात आज नामिबिया विरुद्ध न्यूझीलंड या लढतीतही १३० कोटी भारतीय नामिबियाच्या बाजूनं आहेत. पण, नामिबियाच्या एका निर्णयानं टीम इंडियाचा 'गेम' केला?
टीम इंडिया अन् उपांत्य फेरीचं गणित...
- ग्रुप २ मध्ये पाकिस्तान ८ गुणांसह उपांत्य फेरीत पोहोचला आहे. अफगाणिस्तान ४ गुण व १.४८१ नेट रन रेटसह दुसऱ्या आणि न्यूझीलंड ४ गुण व ०.८१६ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. न्यूझीलंडं तीनच सामने खेळला आहे. भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध विजय मिळवून २ गुण व ०.०७३ नेट रन रेटसह चौथे स्थान पटकावले आहे.
- भारताला उर्वरित दोन सामन्यांत स्कॉटलंड व नामिबिया यांच्याविरुद्ध १२ षटकांत विजय मिळवायला हवा आहे. न्यूझीलंडचे दोन सामने शिल्लक आहेत आणि त्यांनी अफगाणिस्तान व नामिबिया यांचा पराभव केल्यास ते उपांत्य फेरीत प्रवेश करतील. भारताला उर्वरित दोन्ही सामने १०७ धावांच्या फरकानं जिंकावे लागतील. ( भारत १६० धावा करेल हे अपेक्षित धरून)
नामिबियानं केली न्यूझीलंडला मदत...
- सध्याच्या घडीला ग्रुप २ मधून दुसऱ्या स्थानासाठी अफगाणिस्तान व न्यूझीलंड यांच्यात खरी लढत आहे. त्यामुळे रविवारी होणारा अफगाणिस्तान वि. न्यूझीलंड हा सामना उपांत्यपूर्व फेरीचा सामना असणार आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ उर्वरित सामन्यात मोठ्या फरकानं विजय मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
- आज न्यूझीलंड शारजात नामिबियाचा सामना करत आहे आणि न्यूझीलंडला नेट रन रेट सुधारून दुसऱ्या क्रमांकावर झेप घेण्यासाठी नामिबियाविरुद्ध १८० धावा करून प्रतिस्पर्धींना ११२ धावांपर्यंत रोखणे गरजेचे आहे. जर त्यांनी १५० धावा केल्या तर नामिबियाला ८१ धावांत रोखून नेट रन रेट सुधारता येणार आहे. न्यूझीलंडच्या याच प्रयत्नांना नामिबियानं हातभार लावला.
- त्यांनी नाणेफेक जिंकून किवींना प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. आता फॉर्मात असलेली किवी धावांचा पाऊस पाडून नामिबियावर दणदणीत विजयासाठी प्रयत्न करतील आणि त्याचा फटका टीम इंडियाला बसेल.
Web Title: T20 World Cup, NZ vs NAM : Namibia won the toss and decided to bowl first against New Zealand, 1.3 billion Indians are backing Namibia
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.