T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या लढतीत पाकिस्तानचे पारडे जड दिसत आहे. केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांनी चांगली टक्कर देताना संघाला समाधानकारक पल्ला गाठून दिला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी उल्लेखनीय कामगिरी केली. प्रत्युत्तरात बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी चांगली सुरुवात करून देताना ७ षटकांत ६३ धावा उभारल्या आहेत, दरम्यान सुरेश रैनाने ( Suresh Raina) पाकिस्तानच्या संघाचे कौतुक केले.
Kane Williamson ची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ
पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. फिन अॅलन ( ४), डेव्हॉन कॉनवे ( २१) व ग्लेन फिलिप्स ( ६) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांन डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शाहिन आफ्रिदीने १७व्या षटकात ही जोडी तोडली. केन ४६ धावांवर माघआरी परतला. शाहिनने आज २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मिचेलने पाचव्या विकेटसाठी जिमी निशॅमसह २२ चेंडूंत ३५ धावा चोपल्या. मागील वर्ल्ड कपमध्येही त्याने उपांत्य फेरीत अर्धशतक पूर्ण केले होते. मिचेल ३५ चेंडूंत ३ चौकार व १षटकारासह ५३ धावांवर नाबाद राहिला. जिमी निशॅमनेही नाबाद १६ धावा केल्या. न्यूझीलंडने ४ बाद १५२ धावा उभ्या केल्या.
पाकिस्तानसाठी हे लक्ष्य सहज शक्य दिसत होते आणि बाबर आजमनला पहिल्या षटकात जीवनान मिळाले. ट्रेंट बोल्टने टाकलेला चेंडू बाबरच्या बॅटची किनार घेत यष्टीरक्षक कॉनवेच्या दिशेने गेला, परंतु कॉनवेचा अंदाज चुकला व बाबरला जीवदान मिळाले. बाबर व मोहम्मद रिझवान ही जोडी न्यूझीलंडवर भारी पडली होती. पाकिस्तानचे हे दोन्ही फलंदाज सहज धावा करत होते. पाकिस्तानने ६ षटकांत एकही विकेट न गमावता ५५ धावा केल्या.
सुरेश रैना काय म्हणाला? आजच्या सामन्यात पाकिस्तानची कागमिरी पाहून आनंद झाला. ते योद्ध्याप्रमाणे खेळले. पाकिस्तानच्या गोलंदाजांच्या कामगिरीचे विशेष कौतुक. न्यूझीलंडच्या फलंदाजांनीही तुल्यबळ टक्कर दिली. डॅरी मिचेलचे कौतुक, टॉप क्लास इनिंग्ज!, असे सुरेश रैनाने ट्विट केले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"