Join us  

T20 World Cup, NZ vs PAK Live : केन विलियम्सन भिडला, डॅरील मिचेलनेही धू धू धुतला; पण पाकिस्तानने डाव साधला 

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) शड्डू ठोकून उभा राहिला. त्याला डॅरिल मिचेलची चांगली साथ मिळाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 3:13 PM

Open in App

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson) शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्यामुळे त्याची विकेट मिळवण्यासाठी सारेच उतावळे दिसले. केन व डॅरीच मिचेल यांनी पाकिस्तानच्या गोलंदाजांची धुलाई केली. शाहिन आफ्रिदीने आजच्या सामन्यातही उल्लेखनीय कामगिरी करताना केनची विकेट मिळवली. पण, मिचेलने अखेरच्या षटकांत चांगली फटकेबाजी करून पाकिस्तानसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. शादाब खानने क्षेत्ररक्षणात केलेली कामगिरी कौतुकास पात्र ठरली.

केन विलियम्सनची विकेट मिळवण्यासाठी पाकिस्तानचा उतावळेपणा, तोंडावर आपटण्याची आली वेळ 

पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. फिन अॅलनने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने खणखणीत फटका मारून चौकार पाठवला. पण, तिसऱ्या चेंडूवर तो फसला आणि शाहिन आफ्रिदीने त्याला पायचीत करून ४ धावांवर माघारी पाठवला. कर्णधार केन विलियम्सन व डेव्हॉन कॉनवे ही जोडी चतुराईने एकेक धाव घेत किवांचा डाव सावरताना दिसली, परंतु पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानने धक्का दिला. शादाब खानने अप्रतिम थ्रो करून कॉनवेला ( २१) रन आऊट केले. ग्लेन फिलिप्सही ( ६) अपयशी ठरला. पहिल्या १० षटकांत पाकिस्तानचे वर्चस्व पाहायला मिळाले. कर्णधार केन व डॅरील मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. 

१३व्या षटकात केनने खणखणीत षटकार मारून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. केन व मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली आणि १५  षटकांत संघाला १०६ धावांपर्यंत मजल मारून दिली. आफ्रिदीने १७व्या षटकात ६८ धावांची ही भागीदारी संपुष्टात आणली. केन ४६ धावांवर माघआरी परतला. शाहिनने आज २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. मिचेलने ट्वेंटी-२०तील तिसरे अर्धशतक झळकावले. मागील वर्ल्ड कपमध्येही त्याने उपांत्य फेरीत अर्धशतक पूर्ण केले होते. मिचेल ३५ चेंडूंत ३ चौकार व १षटकारासह ५३ धावांवर नाबाद राहिला. जिमी निशॅमनेही नाबाद १६ धावा केल्या.  न्यूझीलंडने ४ बाद १५२ धावा उभ्या केल्या.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२केन विल्यमसनन्यूझीलंडपाकिस्तान
Open in App