T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडवर सहज विजय मिळवला. गोलंदाजांच्या सुरेख कामगिरीनंतर बाबर आजम व मोहम्मद रिझवान या जोडीने एकहाती विजय मिळवून दिला. २००९मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप उंचावल्यानंतर प्रथमच पाकिस्तानचा संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. भारत व झिम्बाब्वे यांच्याकडून पहिल्या दोन सामन्यांत पराभूत झाल्यानंतरही पाकिस्तानने अंतिम फेरीत धडक दिल्याने खेळाडूंचे मनोबल उंचावले आहे. पण, त्यांच्या या विजयानंतर मिस्ट्री गर्लची चर्चा रंगली आहे.
आता होऊ जाऊ दे India vs Pakistan! न्यूझीलंडला हरवल्यानंतर पाकिस्तानचा वाढला जोश
फिन अॅलन ( ४), डेव्हॉन कॉनवे ( २१) व ग्लेन फिलिप्स ( ६) हे ४९ धावांवर माघारी परतल्यानंतर कर्णधार केन विलियम्सन व डॅरील मिचेल यांन डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली. शाहिन आफ्रिदीने १७व्या षटकात ही जोडी तोडली. केन ४६ धावांवर माघआरी परतला. शाहिनने आज २४ धावांत २ विकेट्स घेतल्या. त्यानंतर मिचेलने पाचव्या विकेटसाठी जिमी निशॅमसह २२ चेंडूंत ३५ धावा चोपल्या. मागील वर्ल्ड कपमध्येही त्याने उपांत्य फेरीत अर्धशतक पूर्ण केले होते. मिचेल ३५ चेंडूंत ३ चौकार व १षटकारासह ५३ धावांवर नाबाद राहिला. जिमी निशॅमनेही नाबाद १६ धावा केल्या. न्यूझीलंडने ४ बाद १५२ धावा उभ्या केल्या.
प्रत्युत्तरात बाबर आजम व मोहम्मद रिझवान यांनी शतकी भागीदारी करून पाकिस्तानचा विजय पक्का केला. बाबर ४२ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५३ धावांवर, तर रिझवान ४३ चेंडूंत ५७ धावांवर माघारी परतला. मोक्याच्या क्षणी किवींनी ही महत्त्वाची विकेट मिळवली. मोहम्मद हॅरिसने चौकार-षटकार खेचून पाकिस्तानवरील सर्व दडपण दोन चेंडूंत हलके केले. विजयासाठी २ धावा हव्या असताना हॅरीस ३० धावांवर ( २ चौकार व १ षटकार) बाद झाला. पण, पाकिस्तानने ७ विकेट्स राखून विजय पक्का केला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, NZ vs PAK Live : mystery girl 'Kissing' Video goes viral on social media after Pakistan reach into final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.