T20 World Cup, NZ vs PAK Live : न्यूझीलंडचा विजय पक्का, केन विलियम्सनने दिला पाकिस्तानला जबर धक्का; चाहत्यांमध्ये सन्नाटा

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2022 01:07 PM2022-11-09T13:07:32+5:302022-11-09T13:08:15+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, NZ vs PAK Live : New Zealand won the toss and decided to Bat first, both team play same playing Xi | T20 World Cup, NZ vs PAK Live : न्यूझीलंडचा विजय पक्का, केन विलियम्सनने दिला पाकिस्तानला जबर धक्का; चाहत्यांमध्ये सन्नाटा

T20 World Cup, NZ vs PAK Live : न्यूझीलंडचा विजय पक्का, केन विलियम्सनने दिला पाकिस्तानला जबर धक्का; चाहत्यांमध्ये सन्नाटा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आज त्यांच्यासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. नेदरलँड्सच्या मेहरबानीमुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. पाकिस्तानचे चाहतेही या अनपेक्षित धक्क्याने प्रचंड आनंदी झाले आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडविरुद्ध पाकिस्तान  नेहमीच वरचढ ठरला आहे आणि त्यामुळे चाहत्यांच्या आनंदात भर पडली आहे. पण, सामन्यापूर्वीच पाकिस्तानचे चाहते निराश झाले आहेत, कारण नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. 

Pakistan v New Zealand आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत

  • वन डे वर्ल्ड कप १९९२- पाकिस्तानचा ९ विकेट्स राखून विजय
  • वन डे वर्ल्ड कप १९९९ - पाकिस्तानचा ४ विकेट्स राखून विजय
  • ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७ - पाकिस्तानचा ६ विकेट्स राखून विजय 

मजेशीर आकडेवारी

  • सिडनी क्रिकेट मैदानावरील पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील ही तिसरी ( वन डे व ट्वेंटी-२०) सेमी  फायनल लढत आहे. सेंट ल्युसिया येथील डॅरेन सॅमी नॅशनल स्टेडियम व कोलंबो येथील आर प्रेमदासा स्टेडियम येथे वर्ल्ड कपच्या तीन उपांत्य फेरीच्या लढती झाल्या आहेत. दी ओव्हल व ओल्ड ट्रॅफर्ड येथे प्रत्येकी ४ सेमी फायनल खेळल्या गेल्या आहेत.
  • यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला पॉवर प्लेमध्ये ५.९३च्या सरासरीने धावा करत आल्या आहेत. झिम्बाब्वे आणि नेदरलँड्स यांचा रन रेट हा पाकिस्तानपेक्षा कमी आहे. 
  • मागच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानला उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाकडून हार मानावी लागली होती. त्या सामन्यातील शोएब मलिक, मोहम्मद हाफिज, इमान वासिम व हसन अली यंदाच्या वर्ल्ड कप संघाचे सदस्य नाहीत.
     

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सिडनीवरील खेळपट्टी पाहून जाणकारांनी प्रथम फलंदाजीचाच सल्ला दिला होता आणि कौल किवींच्या बाजूने लागल्याने पाकिस्तानी चाहते निराश झालेला दिसले.

बाबर आजम म्हणाला, आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती. आमच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणताच बदल नाही. संघ चांगली कामगिरी करेल असा मला आत्मविश्वास आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"  

Web Title: T20 World Cup, NZ vs PAK Live : New Zealand won the toss and decided to Bat first, both team play same playing Xi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.