T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. तिसऱ्याच चेंडूवर त्यांचा सलामीवीर फिन अॅलन ( Finn Allen) माघारी परतला. त्यापाठोपाठ डेवॉन कॉ नवे रन आऊट झाला. शादाब खानने सुरेख थ्रो केला. ग्लेन फिलिप्सही अपयशी ठरला. मात्र, केन विलियम्सन शड्डू ठोकून उभा राहिला. त्याने पाकिस्तानी गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली. त्यामुळे त्याची विकेट मिळवण्यासाठी सारेच उतावळे दिसले.
पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार, Umpire ची मदत अन् शाहिद आफ्रिदीकडून शिकार; Video
पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाली. फिन अॅलनने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने खणखणीत फटका मारून चौकार पाठवला. त्यानंतर शाहिन आफ्रिदीच्या दुसऱ्या चेंडूवर LBW ची जोरदार अपील झाले आणि मैदानावरील अम्पायरने बाद दिले. पण फिनने त्वरित DRS घेतला आणि चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला घासून गेल्याचे स्पष्ट दिसले. अम्पायरच्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले. तिसऱ्या चेंडूवर मात्र फिन फसला आणि आफ्रिदीने त्याला पायचीत करून ४ धावांवर माघारी पाठवला. यावेळेस DRS घेऊनही उपयोग झाला नाही.
कर्णधार केन विलियम्सन व डेवॉन कॉनवे ही जोडी चतुराईने एकेक धाव घेत किवांचा डाव सावरताना दिसली, परंतु पॉवर प्लेच्या अखेरच्या चेंडूवर पाकिस्तानने धक्का दिला. शादाब खानने अप्रतिम थ्रो करून कॉनवेला ( २१) रन आऊट केले. पहिल्या ६ षटकांत किवींनी २ बाद ३८ धावा केल्या. ग्लेन फिलिप्सही अपयशी ठरला. पहिल्या १० षटकांत पाकिस्तानचे वर्चस्व पाहायला मिळाले. कर्णधार केन व डॅरील मिचेल यांनी न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. १३व्या षटकात केनने खणखणीत षटकार मारून पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले. केन व मिचेल यांनी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली.
मोहम्मद वासीमच्या १३व्या षटकात केनने षटकार खेचला, पुढील चेंडूवर चेंडू केनच्या थायपॅडला लागून हवेत झेपवला अन् यष्टिरक्षक मोहम्मद रिझवानने तो टिपला. केनची विकेट मिळावी यासाठी पाकिस्तानी एवढे उतावळे होते की त्यांनी काहीच विचार न करता DRS घेतला अन् तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयानंतर ते तोंडवर आपटले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"