Join us  

T20 World Cup, NZ vs PAK Live : पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार, Umpire ची मदत अन् शाहिद आफ्रिदीकडून शिकार; Video 

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2022 1:50 PM

Open in App

T20 World Cup, New Zealand vs Pakistan Live Updates :  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात न्यूझीलंडला अपेक्षित सुरुवात करता आली नाही. पाकिस्तानविरुद्ध आयसीसी वर्ल्ड कप ( वन डे  व ट्वेंटी-२०) स्पर्धेतील उपांत्य फेरीत किवींना एकदाही  जिंकता आलेले नाही. पण, यंदा हा जुना इतिहास बदलण्याच्या निर्धाराने केन विलियम्सन आणि संघ मैदानावर उतरला. पण, तिसऱ्याच चेंडूवर त्यांचा सलामीवीर फिन अॅलन ( Finn Allen) माघारी परतला. खरं तर दुसऱ्याच चेंडूवर अम्पायर मरैस इरास्मस ( Marais Erasmus) यांनी पाकिस्तानच्या बाजूने निकाल दिला होता. 

India vs Pakistan यांच्यात फायनल होऊ देणार नाही; उपांत्य फेरीच्या आधी भारताला चॅलेंज!

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर न्यूझीलंडने उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. आज त्यांच्यासमोर पाकिस्तानचे आव्हान आहे. नेदरलँड्सच्या मेहरबानीमुळे पाकिस्तानचा संघ उपांत्य फेरीत पोहोचला. नाणेफेकीचा कौल न्यूझीलंडच्या बाजूने लागला आहे. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. सिडनीवरील खेळपट्टी पाहून जाणकारांनी प्रथम फलंदाजीचाच सल्ला दिला होता आणि कौल किवींच्या बाजूने लागल्याने पाकिस्तानी चाहते निराश झालेला दिसले. बाबर आजम म्हणाला, आम्हालाही प्रथम फलंदाजी करायची होती.   Pakistan v New Zealand आयसीसी वर्ल्ड कपच्या उपांत्य फेरीत

  • वन डे वर्ल्ड कप १९९२- पाकिस्तानचा ९ विकेट्स राखून विजय
  • वन डे वर्ल्ड कप १९९९ - पाकिस्तानचा ४ विकेट्स राखून विजय
  • ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २००७ - पाकिस्तानचा ६ विकेट्स राखून विजय  

 

पहिल्याच षटकात नाट्यमय घडामोडी

  • फिन अॅलनने पहिलाच चेंडू मिड ऑनच्या दिशेने खणखणीत फटका मारून चौकार पाठवला
  • शाहिन आफ्रिदीच्या दुसऱ्या चेंडूवर LBW ची जोरदार अपील झाले आणि मैदानावरील अम्पायरने बाद दिले. पण फिनने त्वरित DRS घेतला आणि चेंडू पॅडवर आदळण्यापूर्वी बॅटला घासून गेल्याचे स्पष्ट दिसले. अम्पायरच्या निर्णयावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
  • तिसऱ्या चेंडूवर मात्र फिन फसला आणि आफ्रिदीने त्याला पायचीत करून ४ धावांवर माघारी पाठवला.  

 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"     

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानन्यूझीलंड
Open in App