T20 World Cup, NZ vs SCO : भाई असं कोण करतं का?; टीम इंडियाच्या अपयशाची स्कॉटलंडच्या खेळाडूकडून Live Match मध्ये खिल्ली, Video Viral 

T20 World Cup, NEW ZEALAND V SCOTLAND : भारताला पहिल्या दोन सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं १० विकेट्स राखून, तर न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून टीम इंडियावर मात केली

By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2021 05:14 PM2021-11-03T17:14:06+5:302021-11-03T17:15:05+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, NZ vs SCO : Scotland wicketkeeper Matthew Cross to Chris Greaves: "Come on Greavo, Whole India is behind you, New Zealand 5/172, Video | T20 World Cup, NZ vs SCO : भाई असं कोण करतं का?; टीम इंडियाच्या अपयशाची स्कॉटलंडच्या खेळाडूकडून Live Match मध्ये खिल्ली, Video Viral 

T20 World Cup, NZ vs SCO : भाई असं कोण करतं का?; टीम इंडियाच्या अपयशाची स्कॉटलंडच्या खेळाडूकडून Live Match मध्ये खिल्ली, Video Viral 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, NEW ZEALAND V SCOTLAND : भारताला पहिल्या दोन सामन्यांत दारूण पराभव पत्करावा लागला. पाकिस्ताननं १० विकेट्स राखून, तर न्यूझीलंडनं ८ विकेट्स राखून टीम इंडियावर मात केली. भारतीय संघाचे उपांत्य फेरीचं भवितव्य अन्य संघांच्या कामगिरीवर अवलंबून आहे. त्यामुळेच न्यूझीलंड विरुद्ध स्कॉटलंड या सामन्यालाही आता अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. पण, भारताच्या या परिस्थितीची आता खिल्ली उडवली जात आहे. स्कॉटलंड संघाचा यष्टिरक्षक मॅथ्यू क्रॉस ( Matthew Cross ) यानं न्यूझीलंडविरुद्धच्या Live Match मध्ये खिल्ली उडवली आणि सध्या तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. 

प्रथम फलंदाजीला आलेल्या न्यूझीलंडची सुरुवात निराशाजनक झाली. डॅरील मिचेल ( १३), केन विलियम्सन ( ०) व डेव्हॉन कॉनवे ( १) हे आज फार कमाल करू शकले नाही. पण, मार्टिन गुप्तील ( Martin Guptill) हा एकटा भिडला. या सामन्यात त्यानं तुफान फटकेबाजी केली. आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त १५० षटकार खेचणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. या सामन्यात त्यानं विराट कोहलीनंतर आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२०त ३०००+ धावांचा पल्लाही पार केला.  १९व्या षटकात शतकाच्या उंबरठ्यावर गुप्तील बाद झाला. त्यानं ५६ चेंडूंत ६ चौकार व ७ षटकारासह ९३ धावा केल्या. न्यूझीलंडनं ५ बाद १७२ धावा केल्या.  

सामन्यात काय झालं?
स्कॉटलंड संघाचा यष्टिरक्षक मॅथ्यू क्रॉस ( Matthew Cross ) यानं न्यूझीलंडविरुद्धच्या Live Match मध्ये खिल्ली उडवली आणि सध्या तो व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे. ख्रिस ग्रिव्हस् गोलंदाजी करत असताना क्रॉस यष्टिंमागून म्हणत होता, कम ऑन ख्रिस, संपूर्ण भारत आज आपल्या पाठिशी आहे.'' 

पाहा व्हिडीओ...


Web Title: T20 World Cup, NZ vs SCO : Scotland wicketkeeper Matthew Cross to Chris Greaves: "Come on Greavo, Whole India is behind you, New Zealand 5/172, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.