T20 World Cup, PAK vs AUS Live Update : पाकिस्तानला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियानं सामन्याआधीच गेम केला

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ पाकिस्ता आजच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:05 PM2021-11-11T19:05:17+5:302021-11-11T19:09:42+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Australia won the toss and decided to bowl first, Pakistan have named the same team for the 6th match in a row | T20 World Cup, PAK vs AUS Live Update : पाकिस्तानला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियानं सामन्याआधीच गेम केला

T20 World Cup, PAK vs AUS Live Update : पाकिस्तानला मोठा धक्का, ऑस्ट्रेलियानं सामन्याआधीच गेम केला

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत अपराजित राहिलेला एकमेव संघ पाकिस्ता आजच्या उपांत्य फेरीच्या लढतीत ऑस्ट्रेलियाचा सामना करणार आहे. मोहम्मद रिझवान व शोएब मलिक या प्रमुख खेळाडूंना बुधवारी ताप आल्यानं पाकिस्तानंचं टेंशन वाढलं होतं, परंतु ते पुर्णपणे बरे झाले आहेत. त्यामुळे पाकिस्ताननं सुटकेचा निश्वास टाकला आहे. पण, नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं लागला आणि त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील निकाल पाहता प्रथम फलंदाजी करणारा संघ सर्वाधिक पराभूत झाले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानच्या फलंदाजांसमोर मोठं लक्ष्य उभं करण्याचं आव्हान आहे. 


२०१६ च्या टी-२० विश्वचषकात पहिल्या फेरीत बाहेर पडल्यापासून पाकने यंदा फारच दमदार कामगिरी केली. २००९ चा चॅम्पियन राहिलेल्या बाबर आझमच्या नेतृत्वाखालील या संघाने एकही सामना गमावलेला नाही. उभय संघांदरम्यान मागच्या विश्वचषकात उपांत्य सामना खेळला गेला होता. त्यात माइक हसीच्या शानदार कामगिरीमुळे रोमहर्षक सामन्यात ऑस्ट्रेलियाने बाजी मारली होती. फिरकीपुढे ऑस्ट्रेलिया संघ गोंधळतो. २०१० च्या उपविजेत्या ऑस्ट्रेलियाने वेळेवर मुसंडी मारली. आतापर्यंत ही स्पर्धा जिंकू न शकलेल्या या संघाकडे यावेळी संधी असेल. इंग़्लंडविरुद्ध आठ गड्यांनी झालेला पराभव वगळता फिंचच्या नेतृत्वाखालील संघाने प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व गाजविले.  द. आफ्रिकेला नमवून त्यांनी उपांत्य फेरी गाठली.

पाकिस्ताननं ग्रुप १ मध्ये भारत, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड व नामिबिया यांच्यावर विजय मिळवून १० गुणांसह उपांत्य फेरीत प्रवेश केला. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये बाबर २६४ धावांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. मोहम्मद रिझवान २१४ धावांसह सहाव्या क्रमांकावर आहे. या जोडीनं भारताविरुद्ध १५२ धावांची विक्रमी भागीदारी केली होती. 

Web Title: T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Australia won the toss and decided to bowl first, Pakistan have named the same team for the 6th match in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.