T20 World Cup, PAK vs AUS Live Update : कर्णधार बाबर आजमनं प्रशिक्षक मॅथ्यू हेडनला टाकले मागे; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नोंदवला मोठा विक्रम

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : नाणेफेकीचा कौल विरोधात जाऊनही पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सकारात्मक सुरुवात केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 08:05 PM2021-11-11T20:05:18+5:302021-11-11T20:07:55+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Babar Azam breaks the record for the most runs by any player in their first T20 World Cup | T20 World Cup, PAK vs AUS Live Update : कर्णधार बाबर आजमनं प्रशिक्षक मॅथ्यू हेडनला टाकले मागे; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नोंदवला मोठा विक्रम

T20 World Cup, PAK vs AUS Live Update : कर्णधार बाबर आजमनं प्रशिक्षक मॅथ्यू हेडनला टाकले मागे; ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये नोंदवला मोठा विक्रम

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Australia Live Update : नाणेफेकीचा कौल विरोधात जाऊनही पाकिस्तानच्या सलामीवीरांनी सकारात्मक सुरुवात केली. कर्णधार बाबर आजमनं ( Babar Azam) मारलेला कव्हर ड्राईव्ह डोळ्यांचे पारणे फेडणारा होता. मोहम्मद रिझवाननं ( Mohammad Rizwan) सावध सुरुवातीनंतर पहिलाच चेंडू उत्तुंग टोलावला. डेव्हिड वॉर्नरनं तो टीपण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केला, परंतु त्याला अपयश आलं. बाबर-रिझवान ही जोडी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा धैर्यानं सामना करताना दिसली आणि स्टेडियमवर पाकिस्तानच्या पाठिराख्यांची संख्याही अधिक असल्यानं त्यांच्या प्रत्येक रनवर जल्लोष होत होता. 


ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत धावांचा पाठलाग करणारा संघ सर्वाधिकवेळा जिंकला आहे आणि त्यामुळे पाकिस्तानवर दडपण येईल असे वाटत होते. पण, बाबरनं या परिस्थिला सामोरं जावं लागेल याचा अंदाज बांधूनच साखळी फेरीत एका सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचे आव्हान यशस्वी पेलले. त्यामुळे आजच्या सामन्यातही ते आत्मविश्वासानं उतरले. बाबरचा प्रत्येक फटका परफेक्ट होता. बाबर-रिझवान जोडी चोरटी धाव घेत ऑसी गोलंदाजांना हैराण करत होती. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रिझवाननं दाणपट्टा सुरू केला अन् चौकार-षटकार खेचले.

बाबरनं सुरेख खेळ करताना यंदाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मान पटकावला. त्यानं जोस बटलरला ( २६९ धावा) मागे टाकले आहे.पाकिस्तानकडून ट्वेंटी-२० वर्ल्ड कप मध्ये सर्वाधिक धावांचा विक्रमही बाबरच्या नावावर आहे. पण, यापेक्षा एक मोठा विक्रम नावावर करताना त्यानं पाकिस्तानचे सध्याचे फलंदाजी प्रशिक्षक व ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज मॅथ्यू हेडन याचा विक्रम मोडला. पहिल्याच ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये बाबरनं आता २८०* धावा केल्या आहेत. पहिलाच वर्ल्ड कप खेळताना सर्वाधिक २६५ धावांचा विक्रम  हेडनच्या नावावर होता. 

यासह बाबरनं आजच्या सामन्यात ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २५०० धावांचा पल्लाही ओलांडला. त्यानं ६२ डावांमध्ये हा पराक्रम करताना विराट कोहलीचा ( ६८ डाव) आणखी एक विक्रम मोडला. 

 

Web Title: T20 World Cup, PAK vs AUS Live Update : Babar Azam breaks the record for the most runs by any player in their first T20 World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.