Join us  

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : ऑस्ट्रेलियानं पाकिस्तानला 'वेड' लावले, अंतिम फेरीत पोहचण्यापूर्वी जोरदार फटाके फोडले

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 11:14 PM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि मॅथ्यू वेड ( Matthew Wade) यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला. 

कर्णधार बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि फाखर जमान ( Fakhar Zaman) या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या.  पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या.  ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.   

ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली, पुन्हा एकदा शाहिन आफ्रिदी प्रतिस्पर्धींसाठी कर्दनकाळ ठरला. त्यानं पहिल्याच षटकात ऑसी कर्णधार अॅरोन फिंच याला भोपळ्यावर माघारी पाठवलं. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर ( David Warner) आणि मिचेल मार्श यांनी ऑसींचा डाव सावरला. या दोघांनी अर्धशतकी भागीदारी केली. शादाब खाननं ७व्या षटकात मार्शला ( २८) माघारी पाठवलं. स्टीव्ह स्मिथही ( ५) काही कमाल न करता शादाबच्या गोलंदाजीवर बाद झाला. पण, वॉर्नर सुसाट होता आणि त्यानं मोहम्मद हाफिजला मारलेला षटकार तर त्याहुन भन्नाट होता. वॉर्नर ३० चेंडूंत ३ चौकार व ३ षटकार मारून ४९ धावांवर माघारी परतला. 

शादाबनं टाकलेला चेंडू वॉर्नरच्या बॅटच्या बाजूनं जात यष्टिरक्षक मोहम्मद रिझवाच्या हाती विसावला अन् जोरदार अपील झाली. अम्पायरनं वॉर्नरला बाद दिलं अन् तोही काही विचार न करता निघाला. पण, रिप्लेमध्ये चेंडू बॅटला लागलाच नसल्याचे दिसले आणि चर्चेला विषय मिळाला. शादाबनं २६ धावांत ४ विकेट्स घेतल्या. ग्लेन मॅक्सवेलही ७ धावांवर माघारी परतला. ऑस्ट्रेलियाला अखेरच्या सहा षटकांत ६८ धावा करायच्या होत्या. पाकिस्तानी खेळाडूंकडून दोन सोपे रन आऊट चुकले. हसन अलीनं १६व्या षटकात १२ धावा दिल्या आणि ऑसींना २४ चेंडूंत ५० धावा करायच्या होत्या. ३९ वर्षीय शोएब मलिकनं क्षेत्ररक्षणात चपळता दाखवताना पाकिस्तानसाठी रन वाचवले. पण, हॅरीस रौफनं टाकलेल्या त्या १७व्या षटकात १३ धावा आल्या.

मॅथ्यू वेडव व मार्कस स्टॉयनिस यांनी ऑस्ट्रेलियाच्या आशा कायम राखताना सहाव्या विकेटसाठी ३२ चेंडूंत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. हसन अलीनं १८व्या षटकात १५ धावा दिल्या आणि आता ऑसींनी १२ चेंडूंत २२ धावा करायच्या होत्या. शाहिननं १९वे षटक फेकले. पहिल्याच चेंडूवर स्टॉयनिसच्या बॅटला कड लागून तो रिझवानच्या हाती विसावला, परंतु त्याआधी टप्पा पडल्यानं स्टॉयनिसला जीवदान मिळालं. तिसऱ्या चेंडूवर हसन अलीनं मॅथ्यू वेडचा झेल सोडला अन् पाकिस्तानवर दडपण निर्माण झालं. अनुभवी फलंदाज शोएब अलीला धीर द्यायला धावला. पुढच्या चेंडूवर वेडनं मारलेला स्कूप षटकार अप्रतिम होता. पाचव्या चेंडूवर वेडनं आणखी एक षटकार खेचून ७ चेंडू ६ धावा असा सामना जवळ आणला. वेडनं सलग तिसरा षटकार खेचून ऑस्ट्रेलियाला ५ विकेट व ६ चेंडू राखून विजय मिळवून दिला.

वेड १७ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ४१ धावा केल्या,तर स्टॉयनिस ४० धावांवर नाबाद राहिला. ऑस्ट्रेलियानं ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये प्रवेश केला आणि त्यांच्यासमोर न्यूझीलंडचे आव्हान असणार आहे. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१आॅस्ट्रेलियापाकिस्तान
Open in App