T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठी चूक केली, कर्णधार बाबर आजमची लाज घालवली

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. या तिघांची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 09:37 PM2021-11-11T21:37:23+5:302021-11-11T21:46:51+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : PCB TROLLING BABAR AZAM AND HOW, make a huge mistake of Babar Azam record, see post | T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठी चूक केली, कर्णधार बाबर आजमची लाज घालवली

T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं मोठी चूक केली, कर्णधार बाबर आजमची लाज घालवली

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Australia Semi Final Live Update : कर्णधार बाबर आजम ( Babar Azam), मोहम्मद रिझवान ( Mohammad Rizwan) आणि फाखर जमान ( Fakhar Zaman) या त्रिकुटानं आज ऑस्ट्रेलियाची वाट लावली. बाबर-रिझवान यांच्या ७१ धावांच्या भागीदारीनंतर रिझवान व जमान यांनी अखेरच्या १० षटकांत १०५ धावा कुटल्या. या तिघांची फटकेबाजी क्रिकेट चाहत्यांना मंत्रमुग्ध करणारी ठरली आणि ऑस्ट्रेलियन गोलंदाजांच्या मनात धडकी भरवणारी. बाबरनं याही सामन्यात अनेक विक्रम करून टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली ( Virat Kohli) याला मागे टाकले. पण, पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं ( PCB) त्याचं कौतुक करण्याएवजी आपल्याच कर्णधाराची इभ्रत जाईल अशी माहिती दिली. 

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अॅरोन फिंच यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. बाबरचा प्रत्येक फटका परफेक्ट होता. बाबर-रिझवान जोडी चोरटी धाव घेत ऑसी गोलंदाजांना हैराण करत होती. सुरुवातीला सावध खेळणाऱ्या रिझवाननं दाणपट्टा सुरू केला अन् चौकार-षटकार खेचले. पाकिस्तानचा कर्णधार ३९ धावांवर माघारी परतला. बाबरनं पहिल्या विकेटसाठी रिझवानसह ७१ धावा जोडल्या.  ४१ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केलं, ट्वेंटी-२०तील त्याचे हे ११ वे तर या वर्ल्ड कप स्पर्धेतील तिसरे अर्धशतक ठरले. रिझवान ५२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ६७ धावांवर माघारी परतला.  त्यानंतर जमान ३२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५५ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्ताननं ४ बाद १७६ धावा कुटल्या.

बाबर आजमचा विक्रम अन् PCBची चूक
बाबरनं आजच्या सामन्यात ट्वेंटी-२० क्रिकेटमधील २५०० धावांचा पल्लाही ओलांडला. त्यानं ६२ डावांमध्ये हा पराक्रम करताना विराट कोहलीचा ( ६८ डाव) आणखी एक विक्रम मोडला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ३००+ धावा करणारा बाबर पहिला पाकिस्तानी खेळाडू व कर्णधार ठरला. पण, त्यांनी एक पोस्ट केली आणि त्यात बाबरनं विराटचा नव्हे तर चेतेश्वर पुजाराचा विक्रम मोडला अशी माहिती दिली. ट्रोल झाल्यावर त्यांनी ती चूक सुधारली.




PCBनं चूक सुधारली

 

Web Title: T20 World Cup, PAK vs AUS Semi Final Live Update : PCB TROLLING BABAR AZAM AND HOW, make a huge mistake of Babar Azam record, see post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.