पहिल्या षटकात कर्णधार माघारी परतूनही ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी धावांचा रन रेट सुरेख ठेवला. पाकिस्तानच्या धावांपेक्षा त्यांनी पहिल्या १० षटकांत १८ धावा अधिक केल्या, परंतु त्यांनी दोन अतिरिक्त विकेट गमावल्या. टप्प्याटप्प्यानं विकेट पडूनही ऑस्ट्रेलियानं त्यांच्या धावांचा वेग कमी होऊ दिला नाही. डेव्हिड वॉर्नरच्या ( David Warner) फटकेबाजीनंतर मार्कस स्टॉयनिस ( Marcus Stoinis ) आणि मॅथ्यू वेड ( Matthew Wade) यांनी सहाव्या विकेटसाठी तुफानी खेळी केली. पाकिस्तानकडून क्षेत्ररक्षणात झालेल्या चुकांचाही ऑसींना फायदा झाला. दरम्यान, सामन्यानंतर बोलताना पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमनं आपल्या चुकांबद्दल स्पष्टच सांगितलं.
"मॅथ्यू वेडचा कॅच सुटणं हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट होता. जर त्याचा कॅच घेतला असता तर मैदानावर नवा बॅट्समन आला असता. अशावेळी वेगळी परिस्थिती असती, कदाचित सामन्याचा निकालही वेगळा असता," असं बाबर आझम म्हणाला. "ज्या प्रकारे आम्ही खेळ सुरू केला तो आम्ही ठरवल्याप्रमाणेत च होता. आम्ही चांगला स्कोअरही केला. आमची गोलंदाजी आज तितकी चांगली झाली नाही आणि अशा परिस्थितीत तुम्ही कॅच सोडाल तर निकाल असाच बदलेल आणि तोच टर्निंग पॉईंटही होता," असंही त्यानं स्पष्ट केलं.
"आम्ही ज्या पद्धतीनं संपूर्ण स्पर्धेत खेळलो तो खेळ वाखाणण्याजोगा होता. आम्ही येणाऱ्या दिवसांत आणखी चांगलं करण्याचे प्रयत्न करून. प्रत्येक खेळाडूला जो रोल देण्यात आला होता, तो त्यानं योग्यरित्या पार पाडला. ज्या प्रकारे लोकांनी आम्हाला सपोर्ट केलं तेदेखील उत्तम होतं. आम्ही त्यांचे आभार व्यक्त करतो," असंही आझमनं सांगितलं.
"आज मला वाटलं होतं की हा सामना आमच्या हातून निसटून जाईल. ज्या चेंडूवर शाहीननं मला आऊट केलं तो एक चांगला चेंडू होता. आम्ही फिल्डींगच्या वेळी चांगलं क्षेत्ररक्षण केलं. परंतु वेड आणि स्टोयनिस यांनी ज्याप्रकारे खेळ केला तो जबरदस्त होता," असं फिचनं नमूद केलं.