T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारताकडून पहिल्याच सामन्यात पाकिस्तानला पराभव पत्करावा लागला आणि त्यानंतर त्यांनी रडायला सुरुवात केली. विराट कोहलीला टाकलेला फुलटॉस हा NO BALL नव्हता असा दावा कराताना त्यांनी अम्पायर्सवर टीका केली होती. पण, आज त्याच अम्पायरने त्यांच्या बाजूने निर्णय दिल्यावर त्यांनी कोलांटी उडी मारली. बांगलादेशविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात शाकिब अल हसन बाद नसतानाही त्याला बाद दिले गेले. तिसऱ्या अम्पायरच्या निर्णयावर भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा यानेही टीका केली.
नजमूल शांतोची क्रांती! बांगलादेशने झोडपले, पण पाकिस्तानच्या मदतीला अम्पायर्स धावून आले; Video
बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास व मजमुल होसैन शांतो यांनी दमदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीने लिटन दास ( १०)ला शान मसूदच्या हाती झेलबाद केले. शांतो पाकिस्ताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता. शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली. शादाबने सौम्याला बाद केले आणि त्यानंतर कर्णधार शाकिब अल हसनला LBW केले. DRS घेतल्यानंतर शाकिब बाद नसल्याचे स्पष्ट दिसत होते, तरीही तिसऱ्या अम्पायरने त्याला बाद दिले. यावरून वाद सुरू आहे.
शांतोची दमदार खेळी इफ्तिखार अहमदने संपुष्टात आणली. शांतो ४८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले आणि बांगलादेशच्या धावांवर लगाम लावली. आफ्रिदीने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. १ बाद ७३ वरून बांगलादेशची अवस्था ८ बाद १२८ अशी झाली. आफिफ होसैननं नाबाद २४ धावांची खेळी केली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"