Join us  

T20 World Cup, PAK vs BAN : नजमूल शांतोची क्रांती! बांगलादेशने झोडपले, पण पाकिस्तानच्या मदतीला अम्पायर्स धावून आले; Video 

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारतीय संघाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 06, 2022 11:17 AM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारतीय संघाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढवली. लिटन दास व नजमुल शांतो यांनी दमदार खेळ केला, परंतु शादाब खानच्या एका षटकात सामना फिरला. शाकिब अल हसनची विकेट वादग्रस्त ठरली. चेंडू बॅटला लागून पॅडवर आदळला तरीही तिसऱ्या अम्पायरने त्याला बाद दिले. त्यानंतर बांगलादेशचा डाव गडगडला. 

शाकिब अल हसनची विकेट ढापली, बांगलादेशच्या कर्णधाराचा भर मैदानात अम्पायर्सशी राडा, Video 

नेदरलँड्सने अविश्वसनीय विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर केले.  नेदरलँड्सकडून मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर उतरले आहेत.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम  फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास व मजमुल होसैन शांतो यांनी दमदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीला तिसऱ्या षटकात लिटन दासने मारलेला षटकात पाहण्यासारखा होता. पण, त्याच षटकात पॉईंटच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्नात लिटन दास ( १०) शान मसूदच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 

शांतो पाकिस्ताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता आणि बाबर आजम अँड टीमचे मनोबल ढासळताना दिसत होते. शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली. ११व्या षटकात शादाबने ही भागीदारी संपुष्टात आणली. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सौम्या ( २०) झेलबाद झाला. पुढच्याच षटकात शादाबने बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसनला LBW केले. DRS घेतल्यानंतर शाकिब बाद  नसल्याचे स्पष्ट दिसत होते, तरीही त्याला तिसऱ्या अम्पायरने बाद दिले. शाकिब मैदान सोडण्यास तयार नव्हता. शांतोची दमदार खेळी इफ्तिखार अहमदने संपुष्टात आणली. शांतो ४८ चेंडूंत ७ चौकारांच्या मदतीने ५४ धावांवर त्रिफळाचीत झाला. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी सामन्यात पुनरागमन केले आणि बांगलादेशच्या धावांवर लगाम लावली. त्यानंतर बांगलादेशच्या डावाला गळती लागली. शाहिन आफ्रिदीने आजच्या सामन्यात ट्वेंटी-२०तील त्याच्या कारकीर्दित प्रथमच चार विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. आफ्रिदीने २२ धावांत ४ विकेट्स घेतल्या. १ बाद ७३ वरून बांगलादेशची अवस्था ८ बाद १२७ अशी झाली. आफिफ होसैननं नाबाद २४ धावांची खेळी केली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानबांगलादेश
Open in App