T20 World Cup, PAK vs BAN : Shakib Al Hasan ची विकेट ढापली, बांगलादेशच्या कर्णधाराचा भर मैदानात अम्पायर्सशी राडा, Video 

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारतीय संघाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढवली.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2022 10:39 AM2022-11-06T10:39:46+5:302022-11-06T10:40:04+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs BAN : Shakib Al Hasan is given out lbw first ball and the review doesn't save him. He can't believe it!, Bangladesh 3-73 (10.5) | T20 World Cup, PAK vs BAN : Shakib Al Hasan ची विकेट ढापली, बांगलादेशच्या कर्णधाराचा भर मैदानात अम्पायर्सशी राडा, Video 

T20 World Cup, PAK vs BAN : Shakib Al Hasan ची विकेट ढापली, बांगलादेशच्या कर्णधाराचा भर मैदानात अम्पायर्सशी राडा, Video 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, Pakistan vs Bangladesh : भारतीय संघाला संघर्ष करण्यास भाग पाडणाऱ्या बांगलादेशने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानचीही डोकेदुखी वाढवली. लिटन दास व नजिमूल शांतो यांनी दमदार खेळ केला, परंतु शादाब खानच्या एका षटकात सामना फिरला. बांगलादेशचा कर्णधार शाकिब अल हसन याची विकेट तिसऱ्या अम्पायरने ढापली आणि नाराज झालेला शाकिब बराच काळ मैदानावरच उभा राहून निषेध नोंदवताना दिसला. त्याने मैदानावरील अम्पायर्सशी हुज्जतही घातली. 

दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू आफ्रिकेविरुद्ध खेळला; घरच्या माणसाने भन्नाट झेल घेत 'गेम' केला! Video 


नेदरलँड्सने अविश्वसनीय विजय मिळवताना दक्षिण आफ्रिकेला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेबाहेर केले. आफ्रिकेच्या पराभवामुळे भारताच्या उपांत्य फेरीतील स्थानावर शिक्कामोर्तब झाले, परंतु त्याचवेळी पाकिस्तान व बांगलादेश यांच्या सेमी फायनलच्या आशा पल्लवीत केल्या. नेदरलँड्सकडून मिळालेल्या संधीचं सोनं करण्यासाठी दोन्ही संघ मैदानावर उतरले आहेत.बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम  फलंदाजीचा निर्णय घेतला. लिटन दास व मजमुल होसैन शांतो यांनी दमदार सुरुवात केली. शाहिन आफ्रिदीला तिसऱ्या षटकात लिटन दासने मारलेला षटकात पाहण्यासारखा होता. पण, त्याच षटकात पॉईंटच्या दिशेला फटका मारण्याचा प्रयत्नात लिटन दास ( १०) शान मसूदच्या हाती झेल देऊन माघारी परतला. 


मोहम्मद वासीमच्या पुढच्या षटकात शादाब खानने बांगलादेशचा दुसरा  सलामीवीर शांतोचा सोपा झेल टाकला आणि शांतोने त्यानंतर खणखणीत चौकार - षटकार खेचला. शांतो पाकिस्ताच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई करत होता आणि बाबर आजम अँड टीमचे मनोबल ढासळताना दिसत होते. शांतो आणि सौम्या सरकार यांनी दुसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी करून पाकिस्तानची डोकेदुखी आणखी वाढवली. ११व्या षटकात शादाबने ही भागीदारी संपुष्टात आणली. रिव्हर्स स्वीप मारण्याच्या प्रयत्नात सौम्या ( २०) झेलबाद झाला. पुढच्याच षटकात शादाबने  DRS घेतल्यानंतर शाकिब बाद नसल्याचे स्पष्ट दिसत होते, तरीही तिसऱ्या अम्पायरने त्याला बाद दिले. 




सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: T20 World Cup, PAK vs BAN : Shakib Al Hasan is given out lbw first ball and the review doesn't save him. He can't believe it!, Bangladesh 3-73 (10.5)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.