T20 World Cup, PAK vs NED : हॅरीस रौफने नेदलँड्सच्या फलंदाजाचा डोळा जवळपास फोडलाच होता; बघा कसा काढला राग, Video

T20 World Cup, PAKISTAN vs NETHERLANDS :  कात्रित सापडलेला पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडतोय.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 02:39 PM2022-10-30T14:39:25+5:302022-10-30T14:40:02+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup, PAK vs NED : Bas de Leede, who got hit by Haris Rauf's nasty bouncer suffered concussion and has been replaced by Logan van Beek, Video | T20 World Cup, PAK vs NED : हॅरीस रौफने नेदलँड्सच्या फलंदाजाचा डोळा जवळपास फोडलाच होता; बघा कसा काढला राग, Video

T20 World Cup, PAK vs NED : हॅरीस रौफने नेदलँड्सच्या फलंदाजाचा डोळा जवळपास फोडलाच होता; बघा कसा काढला राग, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup, PAKISTAN vs NETHERLANDS :  कात्रित सापडलेला पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडतोय. पण, हे आव्हान टीकवणे हे केवळ त्यांच्या हातात नाही, तर बाबर आजम अँड टीमला इतरांवर विसंबून रहावे लागणार आहे. बांगलादेशने आज झिम्बाब्वेवर रोमहर्षक विजय मिळवून पाकिस्तानला मदत केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान पर्थवर नेदरलँड्सवर वर्चस्व गाजवले. आव्हान टीकवण्याच्या निर्धारात पाकिस्तानचा खेळ अधिक आक्रमक दिसला. त्यात हॅरिस रौफने ( Harish Rauf) त्याच्या वेगवान चेंडूवर नेदरलँड्सचा फलंदाज बॅस डे लिड याचा डोळा जवळपास फोडलाच होता. 

W,W,W! ३ चेंडू ३ विकेट्स; एकही रन आऊट नाही तरी शादाब खानची हॅटट्रिक नाही; जाणून घ्या कसं

शाहिन शाह आफ्रिदीला या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील अखेर पहिली विकेट मिळाली. नेदरलँड्सचा सलामीवीर स्टीफन मायबर्घ ( ६) त्याने माघारी पाठवले. सातव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या शादाबने पहिल्याच चेंडूवर टॉम कुपरची ( १) विकेट घेतली. शादाबने पुढे नेदरलँड्सला आणखी दोन धक्के दिले. कॉलीन एकरमन ( २७) व मॅक्स ओ'डाऊड (८) यांना बाद करून शादाबने नेदरलँड्सची अवस्था ४ बाद ६१ अशी केली. नसीम शाहने एक विकेट घेताना कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला ( १५) माघारी पाठवले आणि नेदरलँड्सचा निम्मा संघ ६९ धावांत तंबूत परतला होता. शादाबने २३ धावांत ३ बळी टिपले. 


सहाव्या षटकाचा पाचवा चेंडू हॅरीस रौफने बाऊन्सर टाकला आणि तो नेदरलँड्सचा अष्टपैलू खेळाडू बॅस डे लिड याच्या हेल्मेटच्या जाळीला लागून डोळ्याखाली आदळला.  बॅस डे लिडला रिटायर्ट हर्ट होऊन माघारी परतावे लागले. बॅस डे लिडच्या जागी बदली खेळाडू म्हणून लॉगन व्हॅन बिक मैदानावर उतरला.  
 

मोहम्मद वासीमने सलग दोन चेंडूंत विकेट्स घेत नेदरलँडची अवस्था बिकट केली. नेदरलँड्सला २० षटकांत ९ बाद ९१ धावा करता आल्या. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील ( पुरुष)  २० षटकं खेळून ही सर्वात निचांक धावसंख्या राहिली. यापूर्वी, २०१२मध्ये झिम्बाब्वेने ८ बाद ९३ ( वि. दक्षिण आफ्रिका) धावा केल्या होत्या.   

 सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup, PAK vs NED : Bas de Leede, who got hit by Haris Rauf's nasty bouncer suffered concussion and has been replaced by Logan van Beek, Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.