T20 World Cup, PAKISTAN vs NETHERLANDS : कात्रित सापडलेला पाकिस्तानचा संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आव्हान कायम ठेवण्यासाठी झगडतोय. पण, हे आव्हान टीकवणे हे केवळ त्यांच्या हातात नाही, तर बाबर आजम अँड टीमला इतरांवर विसंबून रहावे लागणार आहे. बांगलादेशने आज झिम्बाब्वेवर रोमहर्षक विजय मिळवून पाकिस्तानला मदत केली आहे. त्यानंतर आता पाकिस्तान पर्थवर नेदरलँड्सवर वर्चस्व गाजवताना दिसतोय. नेदरलँड्सने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आणि पाकिस्तानच्या गोलंदाजांनी त्यांची कोंडी केली. शादाब खानने ( Shadab Khan) पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली. त्याची ही सलग तीन चेंडूवरील तिसरी विकेट ठरली. त्यात एकही रन आऊट नसतानाही ती हॅटट्रिकसाठी ग्राह्य धरली गेली नाही.
शाहिन शाह आफ्रिदीला या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमधील अखेर पहिली विकेट मिळाली. नेदरलँड्सचा सलामीवीर स्टीफन मायबर्घ ( ६) त्याने माघारी पाठवले. हॅरीस रौफच्या चेंडूवर नेदरलँड्सचा अष्टपैलू खेळाडू बॅस डे लिड रिटायर्ट हर्ट होऊन माघारी परतला. सातव्या षटकात गोलंदाजीला आलेल्या शादाबने पहिल्याच चेंडूवर टॉम कुपरची ( १) विकेट घेतली. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये त्याने सलग ३ चेंडूंत ३ विकेट्स आज पूर्ण केल्या, परंतु ती हॅटट्रिक ग्राह्य धरली जाणार नाही. शादाबने पुढे नेदरलँड्सला आणखी दोन धक्के दिले. कॉलीन एकरमन ( २७) व मॅक्स ओ'डाऊड (८) यांना बाद करून शादाबने नेदरलँड्सची अवस्था ४ बाद ६१ अशी केली. नसीम शाहने एक विकेट घेताना कर्णधार स्कॉट एडवर्ड्सला ( १५) माघारी पाठवले आणि नेदरलँड्सचा निम्मा संघ ६९ धावांत तंबूत परतला.
शादाबची हॅटट्रिक का नाही?
शादाबने आजच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर विकेट घेतली आणि ३ चेंडू ३ विकेट्स हे समीकरण पूर्ण केले. पण, दोन विकेट्स या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात त्याच्या चौथ्या षटकाच्या अखेरच्या दोन चेंडूवर आल्या होत्या. झिम्बाब्वेन विरुद्ध त्याने सिन विलियम्स ( ३१) व रेगिस चकाब्वा ( ०) अशा सलग दोन विकेट्स घेतल्या होत्या. शादाबने त्या सामन्यात २२ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या आणि आजही त्याने २३ धावांत ३ बळी टिपले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, PAK vs NED : Shadab Khan in the last 3 balls in the T20 World Cup 2022: W,W,W; but no Hattrick, know how
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.