Join us  

T20 World Cup, PAK vs SA : ४ बाद ४३ वरून पाकिस्तानची भरारी; आफ्रिका हरल्यास होईल ग्रुप २ मध्ये कोंडी

T20 World Cup, Pakistan vs South Africa : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्या दक्षिण आफ्रिकेला आश्चर्याचा धक्का दिला.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2022 3:16 PM

Open in App

T20 World Cup, Pakistan vs South Africa : पाकिस्तानने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत आजच्या सामन्या दक्षिण आफ्रिकेला आश्चर्याचा धक्का दिला. ४ फलंदाज ४३ धावांवर माघारी परतल्यानंतरही शादाब खान व इफ्तिखार अहमद यांनी आफ्रिकेच्या गोलंदाजांना बेक्कार धुतले आणि संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली.

मोहम्मद रिझवान ( ४), बाबर आजम ( ६) व शान मसूद ( २) हे आघाडीचे फलंदाज वेन पार्नेल, लुंगी एनगिडी व एनरिच नॉर्खिया यांनी माघारी पाठवले. त्यानंतर मोहम्मद हॅरीस व इफ्तिखार यांनी काही काळ डाव सावरला, परंतु हॅरिसच्या ( २८) रुपाने पाकिस्तानला ४३ धावांवर चौथा धक्का बसला. नॉर्खियाने ही विकेट मिळवून दिली. मोहम्मद नवाजने २८ धावा केल्या आणि इफ्तिखारसह त्याने ३९ चेंडूंत ५२ धावांची भागीदारी केली. त्यानंतर इफ्तिखार व शादाब यांनी ३५ चेंडूंत ८२ धावांची भागीदारी करून सामन्याचे चित्र बदलले. 

शादाबने २२ चेंडूंत ३ चौकार व ४ षटकारांसह ५२ धावांची वादळी खेळी केली. नॉर्खियाने ही जोडी तोडली, परंतु तोपर्यंत पाकिस्तानने जबरदस्त कमबॅक केले होते. नॉर्खियाने ४ षटकांत ४१ धावांत ४ विकेट्स घेतल्या. इफ्तिखारही ३५ चेंडूंत ३ चौकार व २ षटकारांसह ५१ धावा कुटल्या. पाकिस्तानने ४ बाद ४३ वरून ९ बाद १८५ धावांचा डोंगर उभा केला. 

आफ्रिकेला उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित करण्यासाठी १८६ धावा करायच्या आहेत. पाकिस्तानने आज विजय मिळवल्यास त्यांचा अखेरचा सामना बांगलादेशविरुद्ध आहे आणि ते तो जिंकून ६ गुणांची कमाई करू शकतात. पण, त्याचा फार उपयोग होणार नाही. पण, बांगलादेश जिंकल्यास आणि झिम्बाब्वेने अनपेक्षितपणे भारताला नमवल्यास नेट रन रेट  निर्णायक ठरेल.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२पाकिस्तानद. आफ्रिका
Open in App