T20 World Cup: Virat Kohli ने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मागणी करताना सांगितले विचित्र कारण

T20 World Cup 2022  : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात पाकिस्तानची धुलाई केली, ती जगभरातील चाहत्यांच्या स्मरणात राहित अशीच होती.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 10:34 AM2022-10-26T10:34:35+5:302022-10-26T10:34:56+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup: Pakistan's former star pacer Shoaib Akhtar "wants" Virat Kohli to retire from T20 Internationals   | T20 World Cup: Virat Kohli ने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मागणी करताना सांगितले विचित्र कारण

T20 World Cup: Virat Kohli ने ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त व्हावे; Shoaib Akhtar ने मागणी करताना सांगितले विचित्र कारण

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 World Cup 2022  : विराट कोहलीने ( Virat Kohli) ज्या पद्धतीने पहिल्या सामन्यात पाकिस्तानची धुलाई केली, ती जगभरातील चाहत्यांच्या स्मरणात राहित अशीच होती. भारतीय चाहते विराटच्या या खेळीने आनंदीत होते, तर पाकिस्तानी चाहत्यांना हा मोठा धक्काच होता. ४ बाद ३० वरून विराट व हार्दिक पांड्या यांनी पाकिस्तानचा तोंडचा घास पळवला. विराटने १९व्या षटकात हॅरिस रौफला मारलेले दोन खणखणीत षटकार पाकिस्तानी चाहत्यांच्या जिव्हारी लागणारे ठरले. त्यात आता पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तर ( Shoaib Akhtar) याने विराटने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घ्यावी अशीच मागणी केली आहे.

 हार्दिक पांड्या अनफिट, नेदरलँड्सविरुद्ध नाही खेळणार? प्रशिक्षक पारस म्हाम्ब्रेंनी दिले अपडेट्स 


पाकिस्तानविरुद्धच्या विराट कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या खेळीचं अख्तरने कौतुक केले. पाकिस्तानविरुद्धची विराटची ही आयुष्यातील सर्वोत्तम खेळी असल्याचे त्याने मान्य केले आणि तो अशी खेळी करू शकला कारण, त्याचा स्वतःवर विश्वास होता. ''विराटने दणक्यात पुनरागमन केले. पण, त्याने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमधून निवृत्त्व व्हावे, ही माझी इच्छा आहे. कारण, तो त्याची संपूर्ण एनर्जी ( ऊर्जा) ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये खर्ची घालत आहे. पाकिस्तानविरुद्ध तो ज्या प्रकारे खेळला, त्या वेगाने तो वन डे क्रिकेटमध्ये तीन शतकं झळकावू शकतो,''असे अख्तरने त्याच्या यूट्युब चॅनेलवर म्हटले.


तो पुढे म्हणाले, तीन वर्ष त्याचा फॉर्म नव्हता, त्याच्या धावा होत नव्हत्या. कर्णधारपदावरून त्याला काढले गेले आणि अनेक लोकं त्याच्याबद्दल बरेच काही बोलत होते. लोकांनी त्याच्या कुटुंबियांनाही यात ओढले, परंतु तो गप्प राहून सराव करत राहिला. त्याने सर्व ताकद पाकिस्तानविरुद्ध वापरली आणि दिवाळीच्या पूर्वसंध्येला चौकार-षटकारांची आतषबाजी केली. ट्वेंटी-२० क्रिकेट आणि त्यात पाकिस्तानविरुद्धचा सामना पुनरागमनासाठी योग्य आहे, हे तो ठरवूनच मैदानावर उतरला होता. किंग इज बॅक आणि मोठ्या जोशात तो आला. त्याच्यासाठी मी खूप आनंदी आहे. तो दिग्गज क्रिकेटपटू आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: T20 World Cup: Pakistan's former star pacer Shoaib Akhtar "wants" Virat Kohli to retire from T20 Internationals  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.