India Playing-11 vs England T20 World Cup: पंत किंवा दिनेश कार्तिक... आर अश्विन की चहल, आज भारत-इंग्लंड प्लेइंग-11 कशी असेल?

T20 वर्ल्डकपमधील आज टीम इंडियासाठी महत्वाचा सामना होणार आहे. आज होणारा सेमी फायनल सामना इग्लंड विरुद्ध एडिलेड येथे दुपारी १.३० वाजता होणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2022 09:55 AM2022-11-10T09:55:35+5:302022-11-10T09:58:13+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup Pant or Dinesh Karthik R Ashwin or Chahal, how will the India-England playing-11 be today | India Playing-11 vs England T20 World Cup: पंत किंवा दिनेश कार्तिक... आर अश्विन की चहल, आज भारत-इंग्लंड प्लेइंग-11 कशी असेल?

India Playing-11 vs England T20 World Cup: पंत किंवा दिनेश कार्तिक... आर अश्विन की चहल, आज भारत-इंग्लंड प्लेइंग-11 कशी असेल?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

T20 वर्ल्डकपमधील आज टीम इंडियासाठी महत्वाचा सामना होणार आहे. आज होणारा सेमी फायनल सामना इग्लंड विरुद्ध एडिलेड येथे दुपारी १.३० वाजता होणार आहे. आजच्या सामन्यात ऋषभ पंत किंवा दिनेश कार्तिकला टीममध्ये स्थान मिळणार आहे. आजचा सामना जी टीम जिंकेल, त्या टीमचा अंतिम सामना १३ नोव्हेंबरला होणार आहे. टीम इंडियाची आज प्लेइंग इलेव्हन नेमकी काय असेल याची चर्चा सुरू आहे.  (India Playing-11 vs England T20 World Cup )

या महत्त्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा आपल्या प्लेइंग-11 मध्ये काही महत्त्वाचे बदल करू शकतो. चाहत्यांसाठी सर्वात मोठा सस्पेन्स हा आहे की दिनेश कार्तिक यष्टिरक्षक म्हणून खेळणार की ऋषभ पंत? तसेच, या सामन्यात फिरकीपटू रविचंद्रन अश्विन खेळताना दिसणार की लेगस्पिनर युजवेंद्र चहलला संधी मिळू शकते.

'ट्रॉफी तुम्हालाच ठेवा, विराट कोहली आम्हाला द्या', पाकिस्तानातून आली ऑफर!

 कालच प्लेइंग इलेव्हन संदर्भात रोहितने संकेत दिले आहेत. त्यानुसार आजच्या सामन्यात रोहित ऋषभ पंतला खेळवू शकतो. भारतीय संघ ग्रुप स्टेजमध्ये झिम्बाब्वेविरुद्ध शेवटचा सामना खेळला होता. यामध्ये कार्तिकच्या जागी पंतला संधी देण्यात आली. 

हा सामना अॅडलेडच्या मैदानावर खेळवला जाणार आहे. फिरकीपटूंनाही या मैदानावर चांगला फायदा होऊ शकतो. ऑस्ट्रेलियाचा लेगस्पिनर अॅडम झाम्पाने या मैदानावर T20 मध्ये सर्वाधिक ८ विकेट्स घेतल्या आहेत. त्यामुळे या खेळपट्वरटी ऑफस्पिनर अश्विनच्या जागी लेगस्पिनर युझवेंद्र चहलला संधी मिळू शकते. याआधी सामन्यात प्रशिक्षक राहुल द्रविड यांनीही उपांत्य फेरीतील खेळपट्टीच्या स्थितीनुसार खेळाडूंना प्लेइंग-11 मध्ये संधी मिळेल, असे संकेत दिले होते. 

टीम इंडिया-इंग्लंड सामन्यासाठी संभाव्य प्लेइंग-11

टीम इंडिया: रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, दिनेश कार्तिक/ऋषभ पंत (विकेटकीपर), अक्षर पटेल, आर अश्विन/युझवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी आणि अर्शदीप सिंग.

इंग्लंड : जोस बटलर (कर्णधार आणि यष्टिरक्षक), अॅलेक्स हेल्स, डेव्हिड मलान/फिल सॉल्ट, बेन स्टोक्स, हॅरी ब्रूक्स, लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, सॅम कुरन, ख्रिस वोक्स, ख्रिस जॉर्डन आणि आदिल रशीद.

आजच्या सामन्यासाठी अशी प्लेइंग इलेव्हन असू शकते. टीम इंडियासाठी आजचा सामना महत्वाचा आहे. 

Web Title: T20 World Cup Pant or Dinesh Karthik R Ashwin or Chahal, how will the India-England playing-11 be today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.