Join us  

IPL 2020चा मार्ग मोकळा झाल्यानं पाकिस्तानचा जळफळाट; माजी क्रिकेटपटूंचे गंभीर आरोप 

ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपूर्वी आशिया चषक रद्द झाल्याचे आशियाई क्रिकेट परिषदेनं जाहीर केलं होतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2020 6:13 PM

Open in App

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) यंदाचा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा स्थगित करण्याची घोषणा केली. आयसीसीच्या या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) खेळवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पण, आयसीसीचा हा निर्णय पाकिस्तानच्या माजी खेळाडूंना पटलेला नाही. शोएब अख्तर आणि रशीद लतिफ यांनी आयसीसीच्या निर्णयावर टीका करताना गंभीर आरोप केले आहेत. यावर्षी आयपीएल व्हावी यासाठीच आयसीसीनं हा निर्णय घेतल्याचा दावा त्यांनी केला आहे.

इरफान पठाननं करून दिली युवराज सिंगला त्याच्या निवृत्तीची आठवण; ट्विटरवर जुगलबंदी

IPL 2020च्या यजमानांची घोषणा केली, पण यूएई क्रिकेट मंडळ म्हणतं...

यंदाचा आशिया चषक पाकिस्तानात होणार होता, परंतु बीसीसीआयच्या विरोधामुळे तो संयुक्त अरब अमिराती किंवा श्रीलंका येथे खेळवण्याचे ठरले. पण, कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे आशिया चषक स्थगित केला गेला. त्यापाठोपाठ वर्ल्ड कप स्थगित झाल्यामुळे पाकिस्तानला आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. त्यात पाकिस्तानी खेळाडूंना आयपीएलमध्ये परवानगी नसल्यानं त्यांना संताप अनावर झाला आहे.  

रशीद लतिफ आणि शोएब अख्तर यांनी ट्वेंटी-20 वर्ल्ड कपबाबात आधीच अंदाज व्यक्त केला होता. लतिफ म्हणाला की,''भारत, पाकिस्तान किंवा इंग्लंड आदी क्रिकेट मंडळं आर्थिक फायदा पाहतील. त्यामुळे हा निर्णयात फक्त बीसीसीआय नव्हे, तर सर्वच मंडळं सहभागी होती. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप न होण्याचा केवळ बीसीसीआयलाच नव्हे, तर इतरांनाही फायदा होणार आहे. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवला जाऊ शकत होता, पण तेव्हा पाकिस्तान सुपर लीगला फटका बसला असता. त्यानंतर एप्रिल-मार्चमध्ये आयपीएल होते. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात बिग बॅश लीग होणार आहे. आता आयसीसीच्या निर्णयानं सर्वांनाच फायदा होणार आहे. आशिया चषक होणार नाही, हे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीनं अधिकृत घोषणा होण्यापूर्वीच जाहीर केलं होतं.''

अख्तरनं दावा केला की, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि आशिया चषक यावर्षी होणार नाही, हे आधीच माहीत होतं. ''आर्थिकदृष्ट्या ताकदवान व्यक्ती किंवा संघटना पॉलिसी ठरवतात आणि त्याचा इतरांना फटका बसण्याची, ते काळजी घेतात. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप आणि आशिया चषक यंदा होणार नाही. या स्पर्धेत भारत-पाकिस्तान एकमेकांविरुद्ध खेळले असते, परंतु त्यांनी तसे होऊ दिले नाही. यामागे अनेक कारणं आहेत आणि मला खोलात जायचे नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप व्हायला हवा होता, परंतु तसे होऊ दिले नाही. ट्वेंटी-20 वर्ल्ड कप खड्ड्यात गेला तरी चालेल, पण आयपीएल झालीच पाहीजे. भारतानं आता क्रिकेट वाचवलं पाहिजे अन्यता त्याचा संपूर्ण पिढीला फटका बसेल,''असे अख्तर म्हणाला.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का!

IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!

जगप्रसिद्ध मल्ल सादिक पंजाबी यांचे पाकिस्तानात निधन 

ग्राऊंडस्टाफच्या मदतीसाठी पुढे आला 'सचिन'; करतोय राशनचं वाटप! 

IPL 2020 पूर्वी टीम इंडिया 'या' देशाविरुद्ध ट्वेंटी-20 मालिका खेळणार? BCCIवर वाढता दबाव

विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!

सावत्र भावानं 27 हजारांसाठी 13 वर्षांच्या बहिणीला विकलं, पण पुढे जे घडलं ते 'भन्नाट' होतं!

कंगना राणौतवर टीका करणारे त्यांचा खरा रंग दाखवतायत; भारतीय क्रिकेटपटूची बॅटिंग

भारतीय क्रिकेटपटू अन् त्यांच्या Ex गर्लफ्रेंड्स; नावं वाचून बसेल धक्का! 

कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक

 

टॅग्स :आयपीएल 2020आयसीसी ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2020शोएब अख्तर