दुबई : ऑक्टोबर महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकाचे आयोजन अखेर पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोना महामारीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे आंतरराष्टÑीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सोमवारी हा निर्णय घेत अधिकृत घोषणा केली.गेल्या दोन महिन्यांपासून या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल आयसीसीत विचारमंथन सुरू होते, दुसरीकडे यजमान क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आयोजन करण्याबद्दल असमर्थता दर्शवल्यानंतर अखेरीस आयसीसीला हा निर्णय घ्यावा लागला.
१८ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंबरदरम्यान आॅस्ट्रेलियात या स्पर्धेचे आयोजन होणार होते. कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता आॅस्ट्रेलियाच्या सरकारने ३० सप्टेंबरपर्यंत संपूर्ण देश लॉकडाऊन केला. मध्यंतरीच्या काळात सरकारने नियमांमध्ये शिथिलता आणली होती. परंतु रुग्णांची संख्या वाढताच सरकारने परत लॉकडाऊन घोषित केला आहे.
कोरोनामुळे देशातील एकंदरीत परिस्थिती आणि क्रिकेट आॅस्ट्रेलियावरचे आर्थिक संकट लक्षात घेता, विश्वचषकाचे आयोजन करणे अशक्य असल्याचे क्रिकेट आॅस्ट्रेलियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आयसीसीच्या आधीच निदर्शनास आणून दिले. तेव्हापासून स्पर्धेचे आयोजन पुढे ढकलणे ही फक्त एक औपचारिकता मानली जात होती.
दरम्यान, २०२१ साली होणारा टी-२० विश्वचषक हा आॅक्टोबर-नोव्हेंबर या काळात खेळवला जाईल, असेही आयसीसीने जाहीर केले आहे.टी-२० विश्वचषकाचे आयोजन पुढे ढकलण्यात आल्यानंतर आता बीसीसीआयसमोर आयपीएलच्या तेराव्या पर्वाचे आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
तेराव्या पर्वाच्या आयोजनासाठी बीसीसीआयने तयारी सुरु केली होती, शिवाय २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर ही तारीख निश्चित करून यूएईत स्पर्धा आयोजनाची तयारी सुरू झाली आहे. आयसीसीने टी-२० विश्वचषकाबद्दल अधिकृत घोषणा जाहीर करण्याची वाट बीसीसीआयला पाहायची होती. आज आयसीसीने घोषणा केल्यानंतर लवकरच बीसीसीआय आयपीएलच्या तेराव्या पर्वाच्या आयोजनाबद्दल अधिकृत घोषणा करेल. (वृत्तसंस्था)
‘दिवाळी विकेंड’चा समावेश नाही
आयपीएलच्या १३ व्या पर्वाच्या आयोजनाबद्दल बीसीसीआयने तयारी सुरू केली आहे. २६ सप्टेंबर ते ८ नोव्हेंबर अशा तारखा बीसीसीआयने नक्की केल्या आहेत.
‘गेल्या काही वर्षांपासून दिवाळी ही संकल्पना बदलली आहे. तुम्ही ब्रॉडकास्ट इंडियन रिसर्च कौन्सिलची (बार्क ) आकडेवारी तपासली की लक्षात येईल की दिवाळीच्या दिवसांमध्ये रेटिंग्ज फारशी चांगली येत नाही. याच कारणामुळे गेल्या काही वर्षांपासून आम्हीही खेळाडूंना दिवाळीच्या काळात सुटी देऊन परिवारासोबत वेळ घालवण्याची संधी देतो. यासंदर्भात स्टार इंडियाच्या अधिकाºयांसोबत बसून चर्चा होऊ शकते. याच एका कारणामुळे आयपीएलचे आयोजन दिवाळीपर्यंत खेचण्यात आलेले नाही,’ अशी माहिती बीसीसीआयच्या अधिकाºयाने वृत्तसंस्थेशी बोलताना दिली.
भारताच्या आॅस्ट्रेलिया दौºयाला डिसेंबरमध्ये सुरुवात होईल. हा दौरा लक्षात घेता आयपीएलचा समारोप वेळेत करण्याची बीसीसीआयची योजना आहे. आयपीएल समारोप जितका लवकर होईल तितक्या आधी भारतीय संघ आॅस्ट्रेलियाकडे रवाना होऊ शकेल. या दौºयाकडे क्रिकेट विश्वाचे लक्ष असल्याचे हा अधिकारी म्हणाला.