T20 World Cup : क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय सामना; विजयाचा जल्लोष करण्यात खेळाडू मग्न अन् प्रतिस्पर्धी फलंदाजांची चतुराई, Video

क्रिकेट हा नाट्यमय खेळ आहे.. इथे क्षणाक्षणाला सामन्याची समीकरणं बदलतात... एखादा संघ सहज जिंकेल असे वाटत असताना एक चेंडू टर्निंग पॉइंट ठरतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2021 07:38 PM2021-11-11T19:38:22+5:302021-11-11T19:39:19+5:30

whatsapp join usJoin us
T20 World Cup qualifier : One of the most dramatic finishes in the history of cricket as USA and Canada played out a match for the ages that went to a Super Over, Watch Video  | T20 World Cup : क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय सामना; विजयाचा जल्लोष करण्यात खेळाडू मग्न अन् प्रतिस्पर्धी फलंदाजांची चतुराई, Video

T20 World Cup : क्रिकेट इतिहासातील सर्वात नाट्यमय सामना; विजयाचा जल्लोष करण्यात खेळाडू मग्न अन् प्रतिस्पर्धी फलंदाजांची चतुराई, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

क्रिकेट हा नाट्यमय खेळ आहे.. इथे क्षणाक्षणाला सामन्याची समीकरणं बदलतात... एखादा संघ सहज जिंकेल असे वाटत असताना एक चेंडू टर्निंग पॉइंट ठरतो. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या पहिल्या उपांत्य फेरीत इंग्लंड सहज विजय मिळवेल असे वाटत होते. न्यूझीलंडला २४ चेंडूंत ५७ धावा करायच्या होत्या, पण, ख्रिस जॉर्डनच्या एका षटकानं सारं चित्र बदललं. जिमि निशॅमनं तुफान फटकेबाजी करून २६ धावा कुटल्या आणि न्यूझीलंडनं ५ विकेट्स व ६ चेंडू राखून बाजी मारली. पण, याहीपेक्षा भारी सामना आज पाहायला मिळाला. अखेरच्या चेंडूवर ३ धावांची गरज असताना फलंदाज फटका मारू शकला नाही आणि चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती गेला. त्यानंतर गोलंदाजी करणाऱ्या संघानं विजयाचा जल्लोष करण्यास सुरुवात केली, परंतु त्यापुढे जे घडले त्यावर विश्वास बसवणे थोडं अवघड आहे. 

आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप अमेरिका क्वालिफायर सामन्यात हा थरार पाहायला मिळाला. अमेरिकाकॅनडा असा हा सामना रंगला होता. कॅनडानं २० षटकांत ५ बाद १४२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात अमेरिकेनं कडवी टक्कर दिली. त्यांना अखेरच्या षटकात विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या. पहिला चेंडू Wide ठरला, परंतु त्यावर धाव घेण्याच्या प्रयत्नात अमेरिकेचा फलंदाज धावबाद झाला. पुढच्या चेंडूवर दोन धावा आणि नंतर षटकार टोलावला गेला. अखेरच्या चेंडूवर अमेरिकेला ३ धावा करायच्या होत्या, परंतु फलंदाज फटका मारण्यापासून चुकला अन् चेंडू यष्टिरक्षकाच्या हाती विसावला. कॅनडाच्या खेळाडूंनी विजयाचा जल्लोष केला अन् त्यावेळेत अमेरिकेच्या फलंदाजांनी दोन धावा धावून काढल्या. त्यानंतर सामना सुपर ओव्हरमध्ये गेला अन् अमेरिकेनं बाजी मारली.

पाहा व्हिडीओ...  



 

Web Title: T20 World Cup qualifier : One of the most dramatic finishes in the history of cricket as USA and Canada played out a match for the ages that went to a Super Over, Watch Video 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.