भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात सध्या सुरू असलेल्या ट्वेन्टी-२० वर्ल्डकपमध्ये सलग दोन सामने जिंकले आहेत. पहिल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला आणि पुढच्या सामन्यात नेदरलँड्सवर दमदार विजय साजरा करत भारतीय संघ 'ग्रूप बी'मध्ये पहिल्या स्थानावर आहे. पण या दोन्ही सामन्यात केएल राहुलची बॅट शांत राहिली. राहुलला दोन डावात केवळ १३ धावा करता आल्या आहे. भारताच्या या सलामीवीर फलंदाजानं पाकिस्तानविरुद्ध ८ चेंडूत ४ धावा केल्या. तर नेदरलँडविरुद्ध १२ चेंडूत ९ धावांवर तो बाद झाला. संघाला खराब सुरुवातीचाही सामना करावा लागला. आता पुन्हा एकदा राहुलच्या संघातील स्थानावर प्रश्न उपस्थित होत आहेत. यातच डगआऊटमध्ये बसलेल्या ऋषभ पंतला केएल राहुलच्या जागी संधी देण्याची मागणी क्रिकेट चाहते करू लागले आहेत.
केएल राहुलचा अनुभव अधिक
खेळाडू | वय | टी-२० | वन-डे | कसोटी |
केएल राहुल | ३० | ६८ | ४५ | ४३ |
ऋषभ पंत | २५ | ६२ | २७ | ३१ |
धावांच्या बाबतीतही केएल राहुल पुढे
खेळाडू | ट्वेन्टी २०- धावा | वनडेतील धावा | कसोटीतील धावा |
केएल राहुल | २१५० | १६६५ | २५४७ |
ऋषभ पंत | ९६१ | ८४० | २१२३ |
गेल्या ४ सामन्यातील कामगिरी
केएल राहुल | ऋषभ पंत |
९ | २७ |
४ | २०* |
५७ | १७ |
५१ | १४ |
रेकॉर्डमध्ये केएल राहुलचे पारडे नक्कीच जड असल्याचे दिसून येते. त्याच्या नावावर टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये २ शतकं जमा आहेत, परंतु ऋषभ पंत हा एक्स फॅक्टर खेळाडू आहे हे नाकारता येणार नाही. त्याचा ऑस्ट्रेलियातील विक्रमही जबरदस्त आहे, पण ते सर्व कसोटी सामन्यातील आहेत. पंतची प्रतिमा फिनिशरची आहे. त्याला डावाची सुरुवात करण्याचा अनुभव आहे, पण सद्यस्थितीत तो ओपनिंग फलंदाज नाही. आता आकडेवारीचा विचार करता चाहत्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत पाहा...