T20 World Cup, India vs England Semi Final : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचा १५ वर्षांचा दुष्काळ संपवणार अशी अपेक्षा आहे. भारतीय संघासमोर उपांत्य फेरीत इंग्लंडचे आव्हान आहे आणि हा संघ डेंजर असल्याचे मत रोहितने आधीच व्यक्त केले होते. पण, इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी भारतीय संघाची धाकधुक वाढवणारी घटना मंगळवारी घडली. नेट मध्ये सराव करताना रोहितच्या हातावर वेगाने चेंडू आदळला आणि त्याला दुखापत झाली. त्यामुळे तो उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळणार की नाही, अशी शंका निर्माण झाली आहे. प्राथमिक उपचार घेतल्यानंतर रोहित ४०-४५ मिनिटांनी सरावाला आला, परंतु त्याच्या दुखापतीचे अपडेट्स आज समोर आले. इंग्लंडचा सामना करण्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहितने त्याच्या खेळण्याबाबत चित्र स्पष्ट केले.
भारत-इंग्लंड यांच्यातली Semi Final पावसामुळे रद्द झाल्यास काय? निर्णायक ठरेल १ गुण
नेमकं काय घडलं?
- रोहित शर्मा, हार्दिक पांड्या व दिनेश कार्तिक आज नेट्समध्ये सराव करत होते. पण, थ्रो डाऊन स्पेशालिस्ट रघून टाकेलल्या चेंडूवर रोहितला दुखापत झाली. रघूने टाकलेला शॉर्ट पिच चेंडू रोहितच्या हातावर जाऊन आदळला. याआधीचा चेंडू रघूने यॉर्कर फेकला होता आणि त्यानंतर शॉर्ट पिच चेंडू फेकला.
- १२०kph च्या वेगाने आलेला चेंडूवर रोहितला दुखापत झाली. विक्रम राठोड व गोलंदाजी प्रशिक्षक पासर म्हाम्ब्रे रोहितच्या दिशेने पळत आले. फिजिओ कमलेश जैन व टीम डॉक्टरही तेथे दाखल झाले. त्यांनी रोहितच्या हातावर आईस पॅक लावला आणि ४० मिनिटे तो एका कोपऱ्यात बसून राहिला.
- थोड्यावेळानंतर रोहित पुन्हा नेट्समध्ये सरावाला आला. तेव्हा त्याला रघू दिसला नाही. त्याने तो कुठेय असे विचारले. त्यावर म्हाम्ब्रे म्हणाले, रोहितकडून बांबूचे फटके मिळाल्यानंतर रघू ड्रेसिंग रुममध्ये गेला. रोहितने त्याला पुन्हा बोलावण्यास सांगितले. रघू येताच अन्य खेळाडूंनी मोठमोठ्याचे चिअर केले. रघूने रोहितची माफी मागितली.
रोहित शर्माने दिले अपडेट्स...
रोहित म्हणाला, काल माझ्या हातावर चेंडू आदळला, परंतु आता मी बरा आहे. मनगटावर थोडसं खरचटलं आहे, परंतु मी उपांत्य फेरीच्या लढतीत खेळणार.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"