Join us  

T20 World Cup, SA vs BAN : १४ वर्षांनंतर वर्ल्ड कप स्पर्धेत विचित्र पद्धतीनं बाद झाला फलंदाज; द. आफ्रिकेचा गोलंदाज अनोख्या हॅटट्रिकच्या उंबरठ्यावर, Video 

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2021 8:16 PM

Open in App

T20 World Cup, SOUTH AFRICA V BANGLADESH : ग्रुप १ मधून इंग्लंडनं सलग चार विजयाची नोंद करून उपांत्य फेरीतील प्रवेश पक्का केला आहे आणि आता दुसऱ्या स्थानासाठी दक्षिण आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांच्यात चढाओढ रंगणार आहे. दक्षिण आफ्रिकेनं Semi Finalच्या दिशेनं दमदार पाऊल टाकताना बांगलादेवर विजय मिळवला. आफ्रिकेनं या विजयासह ४ सामन्यांत ३ विजय मिळवून सहा गुणांसह ग्रुप १ मधील दुसऱ्या क्रमांकावरील पकड मजबूत केली. ऑस्ट्रेलियाच्या ३ सामन्यांत ४ गुण आहेत. पण, या सामन्यात बांगलादेशचा फलंदाज विचित्र पद्घतीनं बाद झाला आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत २००७नंतर प्रथमच अशा प्रकारे बाद होणारा हा पहिलाच खेळाडू ठरला.  

प्रथम फलंदाजीला आलेल्या बांगलादेशला आधीच एक धक्का बसला होता. त्यांचा स्टार अष्टपैलू शाकिब अल हसन ( Shakib ul Hasan) यानं दुखापतीमुळे माघार घेतली आहे. बांगलादेशचा संघ कोसळला. लिटन दास ( २४) व महेदी हसन ( २७) हे बांगलादेशचे टॉप स्कोअरर ठरले. कागिसो रबाडानं २० धावांत ३ आणि नॉर्ट्जेनंही ८ धावांत ३ विकेट्स घेतल्या.  शम्सीनं २१ धावांत २ आणि ड्वेन प्रेटोरीअसनं ११ धावांत १ विकेट घेतली.  

बांगलादेशच्या डावातील १९व्या षटकात नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर महेदी हसन पहिल्याच चेंडूवर झेलबाद झाला, त्यानंतर नसूम अहमद बाद झाला आणि बांगलादेशचा डाव ८४ धावांवर गडगडला. नसूमची हीच विकेट विचित्र ठरली. नॉर्ट्जेच्या गोलंदाजीवर फटका मारण्याच्या प्रयत्नात बॅकफूटवर गेलेल्या नूसननं बॅटच यष्टिंवर आदळली अन् तो हिट विकेट होऊन माघारी परतला. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ऑस्ट्रेलियाच्या मार्क गिलेस्पीच्या गोलंदाजीवर केन्याचा  डेव्हिड ओबूया असा बाद झाला होता. नॉर्ट्जेनं सलग दोन विकेट्स घेतल्या आहेत आणि आता इंग्लंडविरुद्धच्या पुढील सामन्यात त्यानं पहिल्याच चेंडूवर विकेट घेताच अनोखी हॅटट्रिक पूर्ण करेल.

पाहा व्हिडीओ...

प्रत्युत्तरात आफ्रिकेचे तीन फलंदाज ३३ धावांवर माघारी परतल्यानं सामन्यात थोडी चुरस निर्माण होताना दिसली. तस्कीन अहमदनं आफ्रिकेच्या रिझा हेंड्रीक्स ( ४) व एडन मार्कराम ( ०) यांना बाद केलं. क्विंटन डी कॉक १६ धावा करून महेदी हसनच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. रॅसी व्हॅन डेर ड्युसेन व कर्णधार टेम्बा बवुमा यांनी खिंड लढवताना आफ्रिकेला विजय मिळवून दिला. ड्युसेन २२ धावांवर बाद झाला. बवुमा ३१ धावांवर नाबाद राहिला. आफ्रिकेनं ६ विकेट्स व ३९ चेंडू राखून विजय मिळवला. 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२१द. आफ्रिकाबांगलादेश
Open in App