T20 World Cup, South Africa vs Bangladesh : पावसाच्या व्यत्ययानंतर क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांनी षटकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५०+ धावांची विक्रमी भागीदारी केली. या दोघांची १६८ धावांची भागीदारी क्विंटनच्या बाद झाल्याने संपुष्टात आली, परंतु ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटन ३८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर बाद झाला. रोसोवूने वर्ल्ड कप स्पर्धेतील पहिले शतक पूर्ण केले. ट्वेंटी-20 वर्ल्ड कपमध्ये शतक झळकावणारा तो आफ्रिकेचा पहिला खेळाडू ठरला.
नेदरलँड्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत सेमीफायनलमध्ये कसा जाईल?
पावसामुळे झिम्बाब्वेविरुद्धची लढत रद्द झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर आता विजय मिळवण्याशिवाय पर्याय नाही. कर्णधार टेम्बा बवुमाचा फॉर्म हा आफ्रिकेसाठी खरा चिंतेचा कारण आहे आणि बांगलादेशविरुद्दही तो अपयशी ठरला. अवघ्या २ धावांवर तस्कीन अहमदने त्याला माघारी जाण्यास भाग पाडले. सहाव्या षटकात पावसाचे आगमन झाले अन् २० मिनिटं खेळ थांबला. आफ्रिकेने सहा षटकांत १ बाद ६३ धावा केल्या आणि या वर्षातील पॉवर प्लेमधील ही त्यांची सर्वोत्तम धावसंख्या ठरली. बांगलादेशने ७ षटकात रिली रोसोवूसाठी DRS घेतला, मुसाडेक होसैनच्या गोलंदाजीवर रिव्हर्स स्वीप मारण्याच्या रोसोवूचा प्रयत्न फसला अन् चेंडू यष्टीरक्षकाने टिपला. पण, चेंडू पॅडलला लागल्याचे रिप्लेमध्ये दिसले आणि बांगलादेशने दुसरा DRS गमावला.
फॉर्मात असलेल्या क्विंटन डी कॉक आणि रिली रोसोवू यांनी बांगलादेशच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. रोसोवूने ३० चेंडूंत, तर क्विंटनने ३५ चेंडूंत वैयक्तिक अर्धशतक झळकावताना षटकारांचा पाऊस पाडला होता. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १५०+ धावांची भागीदारी करताना मोठा विक्रम केला. ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, २००७ मध्ये हर्षल गिब्स व जस्टीन केम्प यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १२० धावांची भागीदारी केली होती. या दोघांची १६८ धावांची भागीदारी क्विंटनच्या बाद झाल्याने संपुष्टात आली, परंतु ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटन ३८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर बाद झाला.
दरम्यान, बांगलादेशचा यष्टीरक्षक्क नुरूल हसन याने शाकिब अल हसन गोलंदाजी करत असताना अनफेअर खेळ केला आणि आफ्रिकेला पेनल्टीच्या ५ धावा मिळाल्या. त्रिस्तान स्टब्सने आल्याआल्या चौकार खेचला, पण तो ७ धावांवर बाद झाला. रोसोवूने भारताविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत शतक झळकावले होते आणि आज त्याने वर्ल्ड कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध शतकी खेळी केली. त्याच्या या खेळीत ७ चौकार व ७ षटकारांचा समावेश होता, त्याने अवघ्या १४ चेंडूंत ७० धावा कुटल्या.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"