Join us  

T20 World Cup, SA vs BAN : शतक रिली रोसोवूचे पण चर्चेत आला गुस्ताव्ह मॅकेऑन! ट्वेंटी-२०त याच्या नावावर आहे वर्ल्ड रेकॉर्ड 

T20 World Cup, South Africa vs Bangladesh : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांनी षटकारांचा पाऊस पाडला.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2022 11:15 AM

Open in App

T20 World Cup, South Africa vs Bangladesh : क्विंटन डी कॉक ( Quinton de Kock) व रिली रोसोवू ( Rilee Rossouw) यांनी षटकारांचा पाऊस पाडला. बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली आणि ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. रोसोवूने ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दुसरे शतक झळकावून मोठा विक्रम नोंदवला.  

नेदरलँड्सविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाल्यास भारत सेमीफायनलमध्ये कसा जाईल? पाकिस्तानच्या हाती पत्ते

कर्णधार टेम्बा बवुमा ( २) अपयशी ठरला. क्विंटन डी कॉक आणि रिली रोसोवू यांनी ८५ चेंडूंत १६३ धावांची विक्रमी भागीदारी केली.  ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील आफ्रिकेकडून ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी, २००७ मध्ये हर्षल गिब्स व जस्टीन केम्प यांनी वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १२० धावांची भागीदारी केली होती. शिवाय ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या इतिहासातील ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. क्विंटन ३८ चेंडूंत ७ चौकार व ३ षटकारांच्या मदतीने ६३ धावांवर बाद झाला. रोसोवू ५६ चेंडूंत ७ चौकार व ८ षटकारांच्या मदतीने १०९ धावांवर झेलबाद झाला. 

आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये सलग दोन शतकं झळकावणारा रोसोवून दुसरा फलंदाज ठरला. या विक्रम २०२२मध्ये फ्रान्सच्या गुस्ताव्ह मॅकेऑनने ( वि. स्वित्झर्लंड व नॉर्वे) केला आहे ( १८ वर्षीय पोरानं दिग्गजांना जे नाही जमलं ते करून दाखवलं, ट्वेंटी-२०त २४ तासांत दुसरं शतक झळकावलं!). त्यानंतर रोसोवूने ( वि. भारत व बांगलादेश) हा पराक्रम आज केला. शाकिब अल हसनने ही विकेट मिळवून दिली. आफ्रिकेला अखेरच्या ५ षटकांत २९ धावाच करता आल्या आणि ३ विकेट्स गमावल्या. आफ्रिकेला ५ बाद २०५ धावांपर्यंत मजल मारता आली. आफ्रिकेकडून ट्वेंटी-२०तील रोसोवूचे हे पाचवे शतक ठरले आणि त्याने आफ्रिकेकडून या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक शतक झळकावणाऱ्या क्विंटन डी कॉक व कॅमेरोन डेलपोर्ट यांच्याशी बरोबरी केली.  

पाहा व्हिडीओ...

तगड्या लक्षाचा पाठलाग करताना बांगलादेशचे ३ फलंदाज ३७ धावांवर माघारी परतले आहेत आणि एनरिच नॉर्खियाने या तीनही विकेट्स घेतल्या. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२द. आफ्रिकाफ्रान्सबांगलादेश
Open in App