T20 World Cup, South Africa vs Netherlands : नेदरलँड्स संघाने ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या अखेरच्या लढतीत धक्कादायक निकाल नोंदवला. ग्रुप २ मधून उपांत्य फेरीच्या शर्यतीत आघाडीवर असलेल्या दक्षिण आफ्रिकेला पराभवाचा धक्का देत बाहेर फेकला. १५९ धावा या आफ्रिकेसाठी काही जड नव्हत्या. त्यात डेव्हिड मिलर सारख्या फलंदाजाचे पुनरागमन झाल्याने आफ्रिका उपांत्य फेरीत जाईल असेच वाटत होते. पण, मिलरची विकेटच टर्निंग पॉईंट ठरली आणि त्याला जबाबदार दक्षिण आफ्रिकेचा माजी खेळाडू ठरला. एकेकाळी आफ्रिकेकडून खेळणाऱ्या आणि आता नेदरलँड्सचे प्रतिनिधित्व करणाऱ्या रोएलॉफ व्हॅन डेर मर्वे ( Roelof Van Der Merwe ) याने अविश्वसनीय झेल घेत सामन्याला कलाटणी दिली.
इंडिया सेमी फायनलमध्ये! नेदरलँडने ग्रुप २ मधील समीकरणच बदलले; पाकच्या आशा पल्लवित
प्रथम फलंदाजीला उतरताना नेदरलँड्सने ४ बाद १५८ धावा केल्या. स्टीफन मायबर्ग ( ३७), मॅक्स ओ'डाऊड ( २९) यांनी चांगली सुरूवात करून दिली. त्यानंतर टॉम कूपर ( ३५) व कॉलिन एकरमन ( ४१*) यांनी फटकेबाजी करताना संघाला समाधानकारक पल्ला पार करून दिला. केशव महाराजने दोन विकेट्स घेतल्या. दक्षिण आफ्रिका हे लक्ष्य सहज पार करतील असेच वाटत होते. पण, नेदरलँड्सने कमाल करून दाखवली.
क्विंटन डी कॉक ( १३) व टेम्बा बवुमा ( २०) सलग दुसऱ्या सामन्यात अपयशी ठरले आणि त्यानंतर आफ्रिकेची गाडी घसरत गेली. रिली रोसोवू ( २५), एडन मार्कराम ( १७) व डेव्हिड मिलर ( १७) यांना हेही अपयशी ठरले. त्यानंतर आफ्रिकेची गाडी घसरत गेली. रिली रोसोवू ( २५), एडन मार्कराम ( १७) व डेव्हिड मिलर ( १७) यांना हेही अपयशी ठरले. त्यानंतर विजयासाठी आवश्यक धावांची सरासरी वाढल्यामुळे दबावात द.आफ्रिकेचे एकामागोमाग एक फलंदाज बाद होत गेले. अखेरच्या आफ्रिकेला ८ बाद १४५ धावाच करता आल्या.
पाहा अविश्वसनीय झेल
व्हॅन डेर मर्वेने २००४च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेत दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व केले होते. २००९मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ट्वेंटी-२० संघात पदार्पण केले आणि त्या सामन्यात त्याने ४८ धावा व १ विकेट घेतली. आफ्रिकेकडून त्याने वन डे व ट्वेंटी-२० अशा मिळून २६ लढती खेळल्या. २०१५मध्ये त्याने नेदरलँड्सकडून खेळण्याचा निर्णय घेतला.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: T20 World Cup, SA vs NED : catch by Roelof Van Der Merwe became a turning point of match, Van Der Merwe the South African born, who has represented South Africa in the past, coming in between South Africa and T20 World Cup Semis
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.